शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या विचारांनी देशसेवा करा : प्रिन्स शिवाजीराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:49 IST

छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन तरुणाईने देशसेवेसाठी पुढे यावे. त्यांनी देशनिष्ठा बळकट करावी, असे आवाहन तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी  येथे केले.

ठळक मुद्देशिवरायांच्या विचारांनी देशसेवा करा : प्रिन्स शिवाजीराजे भोसलेस्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ‘शिव-जीवनगौरव’ने सन्मानित

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन तरुणाईने देशसेवेसाठी पुढे यावे. त्यांनी देशनिष्ठा बळकट करावी, असे आवाहन तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी  येथे केले.शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे आयोजित ‘शिवमहोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला ‘शिव-जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ‘शिवमहोत्सवा’चे संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर, ‘मॉर्डन होमिओपॅथी’चे विजयकुमार माने, आदी प्रमुख उपस्थित होते. शिवमहोत्सवातील हा सन्मान माझा नसून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केलेल्या कार्याचा असल्याचे प्राचार्य साळुंखे यांनी सांगितले.पी. टी. गायकवाड, अनिल घाटगे, रवींंद्र भणगे, शिवाजी कांबळे, सूरज धनवडे, दत्तात्रय कवाळे, शालन मोरे, नंदिनी पाटील, सुनील कोळी यांना ‘शिवपुरस्कार’, तर सागर अहिवळे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्राचार्य एस. एस. चव्हाण यांना ‘शिव अभिमान’ आणि राजकुमार ढवळे यांना ‘शिवकृषी अभिमान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णासाहेब खेमनर, सुधर्म वाझे, डी. आर. मोरे, व्ही. टी. पाटील, शीतल माने, मंदार पाटील, मंजित माने, चांगदेव बंडगर, आदी उपस्थित होते. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुराज माने यांनी आभार मानले.

सांस्कृतिक कार्यक्रम रंगलापुरस्कार वितरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. त्याची सुरुवात सार्थक भिलारी याच्या शास्त्रीय नृत्याने झाली. पूजा गोटखिंडीकर यांनी ‘अधीर मन झाले’ गीत सादर केले. श्वास अकॅडमीने ‘तान्हाजी’मधील गीतांवरील नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला. त्यानंतर सँड आर्ट, नृत्यांचे सादरीकरण झाले. त्याला टाळ्या-शिट्ट्यांनी दाद देत तरुणाईने जल्लोष केला.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर