शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:14 IST

Shivaji University Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल) ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कला, वा‌णिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा बुधवार (दि. ३०) पासून ऑनलाईन होणार आहे.

ठळक मुद्दे१६ हजार विद्यार्थ्यांसाठी बुधवारपासून पुनर्परीक्षा हिवाळी सत्रातील ९५ टक्के परीक्षांचे निकाल जाहीर

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टिकल) ऑनलाईन पध्दतीने घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्यावतीने कला, वा‌णिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा बुधवार (दि. ३०) पासून ऑनलाईन होणार आहे.गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामध्ये वाढ होण्यापूर्वी विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. त्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या सूत्रानुसार या परीक्षांचे गुण देण्यात आले. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने भरले आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा यूजीसीच्या सूचनेनुसार ऑनलाईन स्वरूपात विद्यापीठाकडून घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये बी. एस्सी., एम. एस्सी. अभ्यासक्रमांतील अधिक विषयांच्या परीक्षांचा समावेश आहे. याबाबत विद्यापीठ अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयानुसार संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध अधिविभागांना सूचना केल्या जाणार आहेत.

ऑफलाईनकडून ऑनलाईन पर्याय नोंदविलेल्या आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. अशा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ऑनलाईन पध्दतीने बुधवारपासून होणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील ६२१ परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ९५ टक्के परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.आजपासून मॉक टेस्टऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठीची सराव चाचणी (मॉक टेस्ट) आज, गुरुवारपासून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून घेतली जाणार आहे. त्याबाबतचे संदेश विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर