शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर ठरले उदयोन्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 13:07 IST

CoronaVirus ShivajiUnivercity : शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिसला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून उदयोन्मुख केंद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याअंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती या सेंटरचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी मंगळवारी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर ठरले उदयोन्मुखराज्य नवोपक्रम संस्थेकडून दर्जा : ५० लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिसला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून उदयोन्मुख केंद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याअंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती या सेंटरचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी मंगळवारी दिली.या नवोपक्रम संस्थेकडून राज्यातील विद्यापीठातील नवोपक्रम केंद्रांच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. संस्थेच्या आढावा बैठकीमध्ये विविध विद्यापीठांचे बिगिनर्स (प्राथमिक), इमर्जिंग (उदयोन्मुख) आणि लीडर (नेतृत्वकर्ता) अशी विभागणी केली आहे. त्यामध्ये उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

याअंतर्गत शिवाजी विद्यापीठास दोन टप्प्यात मिळून एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. याअंतर्गत नवीन स्टार्टअप उपक्रमांची सुरुवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, हॅकेथॉन उपक्रमांचे आयोजन, नवीन सहकार्य संधींचे विकसन, नवीन मेंटॉर्सना प्रशिक्षण, रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन आणि स्टार्टअप्सना बाह्य संस्थांकडून निधी प्राप्तीस प्रोत्साहन, आदी उपक्रम केंद्राकडून राबविण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस स्थापन करण्यामागे विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, काही वेगळ्या संकल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. राज्य नवोपक्रम संस्थेकडून प्राप्त झालेला दर्जा आणि निधी यामुळे अशा नवसंकल्पनांना लॅब टू लँड अँड टू मार्केट असे मूर्त स्वरूप देणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात नवोपक्रम विकास व प्रोत्साहनाचे नियोजन केंद्रामार्फत करण्यात येईल.-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर