शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत ‘शिवाजी विद्यापीठ’ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:54 IST

अव्वल साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत यजमान शिवाजी विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद शुक्रवारी पटकविले. या संघाने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली.

ठळक मुद्देपश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत ‘शिवाजी विद्यापीठ’ विजेतामुंबई विद्यापीठाला उपविजेतेपद; औरंगाबाद विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : अव्वल साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत यजमान शिवाजी विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद शुक्रवारी पटकविले. या संघाने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली.चार गुणांसह मुंबई विद्यापीठ उपविजेते ठरले. दोन गुणांवर असणाऱ्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला. चौथ्या स्थानी राजस्थानचे कोटा विद्यापीठ राहिले. हे संघ केआयआयटी, भुवनेश्वर येथे दि. २६ डिसेंबरपासून होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले.असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजने या वर्षी शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धा घेतली. गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या या स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला. स्पर्धेतील विजेत्या संघांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे त्यांना विजेतेपदाचे चषक देण्यात आले. या संघटनेचे संभाजी पाटील, रमेश भेंडीगिरी, उमा भेंडीगिरी, बाबासाहेब उलपे, अण्णासाहेब गावडे, अजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत ६८ संघ सहभागी झाले होते. त्यांच्यात पहिल्यांदा बाद फेरीतील लढत झाली. त्यातून अव्वल साखळी फेरीत प्रवेश केलेल्या शिवाजी विद्यापीठ, मुंबई, औरंगाबाद आणि कोटा विद्यापीठांत मानांकनासाठी लढती झाली. त्यात सर्व सामने जिंकून शिवाजी विद्यापीठ अव्वल स्थानी राहिले. त्यापाठोपाठ मुंबई, औरंगाबाद आणि कोटा विद्यापीठ राहिले.

या चारीही विद्यापीठांच्या संघांना पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साखळी फेरीतील पहिला सामना शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात झाला.

शेवटची चार मिनिटे बाकी असताना पंचांनी दिलेला निर्णय अमान्य करीत मुंबई विद्यापीठाने सामना सोडला. अखेर शिवाजी विद्यापीठाला पंचांनी २९-२१ अशा गुणांनी विजयी घोषित केले. अत्यंत चुरशीने झालेल्या दुसऱ्या सामन्यात औरंगबाद विद्यापीठाने कोटा विद्यापीठावर ३९-३८ अशा गुणांनी निसटता विजय मिळविला.

मुंबईचा संघसुशांत साहील, अक्षय गोंजारे, सनी होगाडे, ओंकार मोरे, आकाश आडसूळ, आकाश गायकवाड, राहुल शिरोडकर, रोहित जाधव, हृषिकेश कणेरकर, सुरेंद्र कडलगे, अनिरुद्ध मेहर, सिद्धान्त बोरकर, प्रशिक्षक यशवंत पाष्टे, व्यवस्थापक सूर्यकांत ठाकूर.

औरंगाबादचा संघजावेदखान पठाण, शंकर काळे, ओंकार सोनावणे, महारुद्र गर्जे, हनुमंत गर्जे, आदित्य शिंदे, आकाशा पिकलगुंडे, प्रदीप आकनगिरे, आकाश गव्हाणे, विशाल घनगाव, प्रशिक्षक डॉ. वसंत झेंडे, व्यवस्थापक माणिक राठोड, जनरल मॅनेजर बापूसाहेब धोंडे.

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीkolhapurकोल्हापूर