शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव कदम यांना रा. कृ. कणबरकर पुरस्कार जाहीर

By समीर देशपांडे | Updated: March 31, 2023 18:10 IST

याआधी प्रा. सी.एन.आर. राव, रयत शिक्षण संस्था, सातारा, डॉ. जब्बार पटेल, प्रा. एन.डी. पाटील, आणि डॉ. डी.वाय. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सिनेट सभागृहात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. १ लाख ५१ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. शिर्के म्हणाले, कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराच्या शोध समितीने सन २०२३ च्या पुरस्कारासाठी कदम यांची एकमताने निवड केली. डॉ. कदम यांनी एक प्रभावी शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, एक उत्साही संशोधक आणि तळमळीचा समाजसेवक म्हणून दिलेले योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याआधी प्रा. सी.एन.आर. राव, रयत शिक्षण संस्था, सातारा, डॉ. जब्बार पटेल, प्रा. एन.डी. पाटील, आणि डॉ. डी.वाय. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ