शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 13:04 IST

शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठ केंद्रावर पदवीधर गटासाठी मतदान केले. डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनीही सकाळीच मतदान के

ठळक मुद्देशिक्षक गटातून ६0 टक्के मतदान, पदवीधरसाठी प्रचंड उत्साह७२ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणात; मतमोजणी सोमवारीराज्यशास्त्राचे अभ्यासमंडळ बिनविरोध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाने मतदान सुरु झाले आहे.शहरातील सायबर कॉलेज, कॉमर्स कॉलेज, शहाजी कॉलेज येथील मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पदवीधर गटासाठी उत्स्फुर्तपणे मतदान सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सक्रीय झाले आहेत. वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर ते भेटी देत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठ केंद्रावर पदवीधर गटासाठी मतदान केले. डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनीही सकाळीच मतदान केले.पदवीधर गटातून मतदानाला सर्वच केंद्रावरुन उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक गटात आतापर्यंत ६0 टक्के मतदान झाल्याचे समजते.

नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३३ केंद्रांवर मतदान होत आहे. विविध अधिकार मंडळांच्या ७२ जागांसाठी १५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ११ अभ्यासमंडळांसह इतर चार गटांतील १६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा प्रत्यक्ष गाठीभेटी, मोबाईल आणि सोशल मीडियावर प्रचार रंगला होता.नव्या विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा, अभ्यास मंडळे, प्राचार्य, संस्थाचालक, नोंदणीकृत पदवीधर, महाविद्यालय शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्या परिषद (शिक्षक) गटनिहाय निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १८८ जागा आहेत. त्यांपैकी ११ अभ्यास मंडळे (विभागप्रमुख) आणि संस्था प्रतिनिधी सहा, नोंदणीकृत पदवीधर एक, शिक्षक (अधिसभा) एक आणि प्राचार्य गटातील आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

या सर्व गटांतील उर्वरित एकूण ७२ जागांसाठी १५६ उमेदवारांमध्ये लढत रंगली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीसह काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू होता. दरम्यान, या निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे मतदान सुरु आहे. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले की, विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये सोमवारी (दि. २०) सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. यासाठी २० टेबल असणार आहेत.राज्यशास्त्राचे अभ्यासमंडळ बिनविरोधविद्यापीठातील ४७ अभ्यास मंडळांसाठी यावेळी निवडणूक होणार आहे. यातील राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे धडे देणाºया या अभ्यासक्रमाची निवडणूक बिनविरोध झाल्याची चर्चा काही आश्चर्ययुक्त आणि हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने विद्यापीठात रंगली आहे.

 

 

टॅग्स :universityविद्यापीठElectionनिवडणूक