शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 17:17 IST

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील यांना सन २०१७-१८ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहातप्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

कोल्हापूर : भारताला महान समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्याचा आधार घेत ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योग्य व जबाबदार वापरातून भारताची ‘विश्वगुरू’ ही जुनी ओळख दृढ करा, असे आवाहन ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ व ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सोमवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील यांना सन २०१७-१८ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यासह वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे यांना एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. उत्साही वातावरणात पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात ५० हजार ४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ किरणकुमार म्हणाले, समाजाच्या विकासात शिक्षणाचा मोठा वाटा आहे. आजच्या गतिमान युगात शिक्षणाची प्रक्रिया निरंतर आहे. या स्थितीत ‘लर्न-अलर्न-रिलर्न’ (शिका-विसरा-पुन्हा शिका) ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. निसर्ग हा महान शिक्षक आहे. गरूडाकडे पाहून एअरक्राफ्टची,तर शार्कपिनच्या रचनेनुसार जहाजाची निर्मिती झाली. समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र, समाजाचे भले करताना तंत्रज्ञानाचे शोषण करणे चुकीचे आहे.

या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी डॉ. शिर्के म्हणाले, नवे जग वेगवान, स्पर्धेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच काही महत्त्वाची जीवनकौशल्ये, तंत्रकौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी सव्वाअकरा वाजता परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, ए. एम. गुरव, भारती पाटील, पी. डी. राऊत, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. नंदिनी पाटील, आलोक जत्राटकर, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ