शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ नावाचा विषय ६० वर्षापूर्वी निकाली : प्रा. एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:28 IST

शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा विषय ६० वर्षापूर्वीच निकाली निघाला आहे. त्याचा आता नामविस्तार झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच नजरेआड होईल, अशी चिंता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला आपल्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमींचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने नामविस्ताराला विरोध करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठ नावाचा विषय ६० वर्षापूर्वी निकाली : प्रा. एन. डी. पाटील शिवप्रेमींतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नामविस्तारास विरोध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा विषय ६० वर्षापूर्वीच निकाली निघाला आहे. त्याचा आता नामविस्तार झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच नजरेआड होईल, अशी चिंता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला आपल्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमींचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने नामविस्ताराला विरोध करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.प्रा. पाटील म्हणाले, ‘स्थापनेवेळीच विद्यापीठाच्या नावासाठी नेमलेली चिकित्सा समिती व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यात चर्चा होऊनच हे नाव निश्चित करण्यात आले होते; परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून तो ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावा, अशी सूचना राज्यपालांना केली आहे. शिवाजी महाराजांचे नाव आदरयुक्त असावे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे; परंतु नामविस्तार झाल्यास शिवाजी महाराजांचे नावच गायब होईल; त्यामुळे या नामविस्तारास आमचा विरोध आहे.शिष्टमंडळात डॉ. जयसिंगराव पवार, वसंत मुळीक, प्राचार्य टी. एस. पाटील, दिलीप पवार, सुभाष वाणी, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, डॉ. डी. आर. मोरे, बाबा सावंत, उदय धारवाडे, प्रा. किसन कुराडे, गणी आजरेकर, कादर मलबारी, रमेश मोरे, रमेश पोवार, अशोक पोवार, अशोक भंडारे, बाबूराव कांबळे, बबन रानगे, महादेव पाटील, अवधूत पाटील, प्रा. मधुकर पाटील, युवराज कदम, प्रभाकर पाटील, डॉ. लखन भोगम, रवी जाधव, आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर