शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

शिवाजी विद्यापीठाचा माहितीपट तयार

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

‘मास कम्युनिकेशन’चा उपक्रम : ‘सुवर्णमहोत्सवी’ वाटचालीची तेरा मिनिटांची सफर

कोल्हापूर : अवघ्या १३ मिनिटांत शिवाजी विद्यापीठाची ५० वर्षांतील वाटचालीची सफर घडवून आणण्याची किमया ‘मास कम्युनिकेशन’च्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांनी विभागात शिकविण्यात आलेला अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांच्या जोरावर विद्यापीठाचा इंग्रजी भाषेतील माहितीपट पहिल्यांदाच साकारला आहे.‘नॅक’ समिती भेटीच्या अनुषंगाने ‘मास कम्युनिकेशन’ने विद्यापीठाचा माहितीपट तयार करण्याचा निर्णय घेतला. या विभागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘फिल्ममेकिंग’ची रितसर माहिती नव्हती. शिकलेली थिअरी आणि पाहिलेली प्रात्यक्षिके यांच्या बळावर त्यांनी काम सुरू केले. ‘मास कम्युनिकेशन’च्या समन्वयक डॉ. नीशा पवार, डॉ. वासंती रासम, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी १३ मिनिटांचा माहितीपट साकारला आहे. त्यात विद्यापीठाची स्थापना, वर्तमान स्थिती, शैक्षणिक, संशोधन, कला व क्रीडा, आदी क्षेत्रांतील कामगिरी तसेच भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला आहे. माहितीपटाची संहिता अनिल देशमुख यांनी लिहिली असून, प्रसाद ठाकूर यांच्या साथीने त्यांनी दिग्दर्शन केले. निर्भय उलस्वार या विद्यार्थ्याने उत्कृष्ट छायाचित्रण केले. जगदीश गुरव यांनी संकलन केले. सागर सावंत आणि राहुल गडकर यांनी कॅमेरा सहायक, मोनिका जसुजाने नॅरेशन, तर यशवंत वणिरे यांनी ध्वनिसंकलन केले. धनाजी सुर्वे, शंकर कांबळे, सुष्मिता राऊत, ऐश्वर्या जाधव, पूजा करके, गणेश कांबळे यांनी संशोधनाची आणि योगेश चौगुले, तेजस्विनी कुंभार, त्रिरत्न कांबळे यांनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली. जयप्रकाश पाटील, प्रिया जाधव, श्वेता किल्लेदार, शीतल देसाई, सद्दाम शेख, अश्विनी पाटील, गणेश अंबराळे, अतुल फराटे यांच्यासह पत्रकारिता व संवादशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने त्यांना सहकार्य केले. ‘नॅक’ समितीसमोर या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले आहे शिवाय माहितीपट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाची ओळख करून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा स्वरूपातील नवमाध्यमाचा वापर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) कमी वेळेत विद्यापीठाचे समग्र दर्शन घडविण्याचे आव्हान होते. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाप्रती असलेल्या आत्मियतेतून ते सहजपणे पेलले. इंग्रजी भाषेतील विद्यापीठाचा हा पहिलाच माहितीपट आहे. तांत्रिक स्वरूपातील अपुरी साधने असतानाही एक चांगला माहितीपट बनविण्यात आम्हाला यश आले. त्यासाठी विद्यापीठाचे प्रशासन, विविध अधिविभाग, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.- डॉ. नीशा पवार,समन्वयक, मास कम्युनिकेशनकमी वेळेत विद्यापीठाचे समग्र दर्शन घडविण्याचे आव्हान होते. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाप्रती असलेल्या आत्मियतेतून ते सहजपणे पेलले. इंग्रजी भाषेतील विद्यापीठाचा हा पहिलाच माहितीपट आहे. तांत्रिक स्वरूपातील अपुरी साधने असतानाही एक चांगला माहितीपट बनविण्यात आम्हाला यश आले. त्यासाठी विद्यापीठाचे प्रशासन, विविध अधिविभाग, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.- डॉ. नीशा पवार,समन्वयक, मास कम्युनिकेशन