शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा २२ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:49 IST

Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून सुरू करण्यात याव्यात. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी ओएमआर शीटचा वापर करावा. प्रात्यक्षिक परीक्षा दि. २१ मार्चपूर्वी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांनी पूर्ण कराव्यात, आदी विविध शिफारसी विद्या परिषद सदस्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने केल्या.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा २२ मार्चपासून ओएमआर शीटचा वापर : परीक्षा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा दि. २२ मार्चपासून सुरू करण्यात याव्यात. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांसाठी ओएमआर शीटचा वापर करावा. प्रात्यक्षिक परीक्षा दि. २१ मार्चपूर्वी विद्यापीठातील अधिविभाग आणि महाविद्यालयांनी पूर्ण कराव्यात, आदी विविध शिफारसी विद्या परिषद सदस्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ परीक्षा नियोजन समितीने केल्या.या हिवाळी सत्रामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील एकूण ६२१ परीक्षा होणार आहेत. त्यात प्रथम वर्षाच्या परीक्षांची संख्या १०० आहे. ८० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने यापूर्वी केले आहे. या विविध अभ्यासक्रमांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक, त्यांचे स्वरूप, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांची जबाबदारी निश्चिती करण्याबाबत गुळवणी समितीची विद्यापीठात बैठक झाली.

तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाइन अथवा ऑनलाइन यापैकी ज्या पद्धतीने शक्य होईल तशी विद्यापीठातील अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांनी दि. २१ मार्चपूर्वी घ्यावी. पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा अधिविभाग, महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर घ्याव्यात. अभ्यासमंडळांनी प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.

या प्रश्नपत्रिका आणि त्या सोडविण्यासाठी ओएमआर शीट विद्यापीठाकडून पुरविण्यात याव्यात आदी शिफारसी विद्यापीठाला या गुळवणी समितीच्या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी डॉ. गुळवणी, डॉ. एच. एन. मोरे, जी. एस. गोकावी, एस. बी. भांबर, डी. एच. दगडे, पी. बी. चव्हाटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे आदी उपस्थित होते.५० गुणांच्या पेपरसाठी एक तासया परीक्षांसाठी २५ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा ५० गुणांचा पेपर (प्रश्नपत्रिका) असेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी एक तासाची वेळ असणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, मॅनेजमेंट, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा क्लस्टर पद्धतीने होतील. त्याची जबाबदारी शाखानिहाय प्रत्येकी एका महाविद्यालयांकडे देण्यात येईल.

बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याच्यादृष्टीने वेळापत्रक निश्चित केले जाईल. आमच्या समितीने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारशींचा अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे.-डॉ. मेघा गुळवणी,अध्यक्ष, विद्यापीठ परीक्षा नियोजन समिती

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • परीक्षांची संख्या : ६२१
  • विद्यार्थ्यांची संख्या : सुमारे दोन लाख
टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर