शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ परिसर, महाविद्यालये तत्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:44 IST

Shivaji University Kolhapur- पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू नसल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये तत्काळ पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) सुरू करावीत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मंगळवारी केली. त्याबाबतचे निवेदन अभाविपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ परिसर, महाविद्यालये तत्काळ सुरू कराअभाविपची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू नसल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये तत्काळ पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) सुरू करावीत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मंगळवारी केली. त्याबाबतचे निवेदन अभाविपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विद्यापीठात ह्यउच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर हा उपक्रम राबविण्यात आला.

त्यावेळी कोविडच्या नियमांचा फज्जा उडाला. या दुटप्पी भूमिकेचे अभाविप निषेध करते. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी. विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालये तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती अभाविपचे कोल्हापूर महानगरमंत्री ऋषिकेश माळी यांनी दिली.कुलगुरू, कुलसचिवांवर कारवाई कराजिल्हा प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांबाबतच्या सूचना देऊनही विद्यापीठ आरोग्यधिकारी यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या नसल्याच्या कारणास्तव कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव विलास नांदवडेकर, आरोग्यधिकारी यांच्यावर शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर