शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानामुळे शिवाजी विद्यापीठाचा परिसर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:26 IST

विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा साफ केला; त्यामुळे हा परिसर चकाचक झाला.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानामुळे शिवाजी विद्यापीठाचा परिसर चकाचकविद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग; महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपक्रम

कोल्हापूर : विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा साफ केला; त्यामुळे हा परिसर चकाचक झाला.या अभियानात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एन. सी. सी. भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये, तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली.

गवत, झुडपे, अशा स्वरूपातील ४० ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला. अभियानानंतर मुख्य इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते. गांधी अभ्यासकेंद्राच्या संचालक डॉ. भारती पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची तसेच स्वच्छतेची शपथ दिली.

यावेळी विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित फिट इंडिया प्लॉगिंग दौड उत्साहात पार पडली. त्यात विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले.

गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे, तसेच परिसरात वावरणाºया व्यक्तींच्या सजगतेमुळे विद्यापीठाचा परिसर हा बहुतांश प्लास्टिकमुक्त बनला आहे. तथापि, अलिकडेच सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या काही क्रीडा स्पर्धांमुळे त्या मैदानाच्या परिसरात चॉकलेट-बिस्कीटांचे रॅपर मोठ्या प्रमाणात पडले होते. ही बाब लक्षात येऊन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी त्या परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्राधान्य दिले. अर्ध्या तासात तेथील प्लास्टिक कचरा संकलित केला. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर