शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर ‘शिवाजी विद्यापीठ’ हॅशटॅग मोहीम, टी शर्टलाही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:08 IST

शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये. विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली विनंती मागे घ्यावी, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देसोशल मीडियावर ‘शिवाजी विद्यापीठ’ हॅशटॅग मोहीम, टी शर्टलाही मागणी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी, मोहिमेला पाठिंबा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये. विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली विनंती मागे घ्यावी, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यात आली. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन- जर्नालिझम विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टी शर्टलाही मागणी आहे. नामविस्तार झाल्यास या विद्यापीठाचा उल्लेख आद्य इंग्रजी अक्षरात केला जाईल; त्यामुळे प्रेरणादायी इतिहास डोळ्यांसमोरून हळूहळू झाकून जाण्याची भीती आहे; त्यामुळे विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा हॅशटॅग चालविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अनेक युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होऊन रात्री आठ ते नऊ या वेळेत संंबंधित हॅशटॅग चालवून या मोहिमेला पाठिंबा दिला.

शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव वर्षात मास कम्युनिकेशन विभागाने #माझंविद्यापीठ #शिवाजीविद्यापीठ' असं स्लोगन असलेले टी शर्ट विद्यार्थ्यांना दिले होते. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन- जर्नालिझम विभागामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विभागाचे स्वतंत्र टी शर्ट तयार केले होते. पुढे खिशाजवळ डिपार्टमेंटचा लोगो आणि पाठीवर 'माझं विद्यापीठ;शिवाजी विद्यापीठ' असं स्लोगन छापलं होतं. शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर हे स्लोगन सध्या भाव खात आहे. 

अभिजित झाम्बरे-पाटीलमाजी विद्यार्थी.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर