शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिवाजी पूलप्रश्नी आत्मक्लेश-- नदीपात्रात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:58 IST

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अपूर्ण बांधकामाबाबत प्रशासनाकडून होणाºया दिरंगाईबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या अर्धवट पुलावर काळे निशाण फडकविले

ठळक मुद्दे: सर्वपक्षीयांनी डोक्यात जोडे मारून केला शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अपूर्ण बांधकामाबाबत प्रशासनाकडून होणाºया दिरंगाईबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या अर्धवट पुलावर काळे निशाण फडकविले. तसेच पंचगंगा नदीच्या पाण्यात उभे राहून पायातील जोडे स्वत:च्या डोक्यात मारून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले. निमित्त होते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीचे!

डिसेंबर २०१५ पासून या पर्यायी शिवाजी पुलाचे काम अर्धवट स्थितीत रेंगाळले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आश्वासने दिली. पुलाच्या कागदपत्रांची फाईल मंत्रालयात फिरत राहिली; पण पूल दोन वर्षांनंतरही अपूर्णच राहिला. आश्वासनाच्या गर्तेत अडकलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलने थांबविली होती; पण अखेर पुलाचे उर्वरित काम सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले. प्रथम सर्वपक्षीय कृती समितीचे सर्व कार्यकर्ते केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत अर्धवट बांधकाम झालेल्या पर्यायी शिवाजी पुलावर गेले. तेथे खुर्ची ठेवून स्वर्गीय माजी खासदार मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पुलावर काळे झेंडे लावून निषेधाच्या घोषणा दिल्या.

काही वेळाने सर्व कार्यकर्ते या पुलाच्या खाली पंचगंगा नदीच्या पाण्यात उतरून त्यांनी स्वत:चे पायातील जोडे स्वत:च्याच डोक्यात मारून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनात माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक पोवार, भगवान काटे, सुभाष देसाई, गणी आजरेकर, वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, आदी सहभागी झाले होते.‘लोकमत’चा पाठपुरावापर्यायी शिवाजी पुलाचे काम थांबल्यापासून ‘लोकमत’ने या बातमीसाठी पाठपुरावा केला आहे. बुधवारच्या अंकात (दि. ४ आॅक्टोबर) ‘शिवाजी पुलाला आता लोकसभेची मंजुरी आवश्यक’ या मथळ्याखाली पुलाच्या कामाची सद्य:स्थिती दर्शविली होती.या पुलाच्या कामाबाबत अधिकाºयांकडून पाठपुरावा ठप्प असल्याची स्थिती दर्शविली होती. त्याचा परिपाक म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी या अर्धवट स्थितीतील पुलावर आत्मक्लेश आंदोलन केले. आता पुढील आंदोलन राष्टÑीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात करणार असल्याचे आंदोलनकांनी यावेळी जाहीर केले.'शिवाजी पुलावर गर्दी; वाहतूक खोळंबलीपर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाबाबत सर्वपक्षीय कृती समितीने केलेले अभिनव आंदोलन पाहण्यासाठी पुलावर नागरिकांची दुतर्फा गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ या पुलावरून जाणारी वाहतूक खोळंबली होती.