शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

शिवाजी पूल दुचाकी; तीनचाकी वाहनांसाठी खुला, पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:00 IST

शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे

ठळक मुद्देशिवाजी पूल दुचाकी; तीनचाकी वाहनांसाठी खुलापावसाचा जोर कमी; पूरस्थिती कायम ५७ बंधारे पाण्याखाली : दूधगंगेतून जलविसर्ग वाढविला

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर शनिवारी कमी राहिला. असे असले तरी तुडुंब भरलेल्या नद्यांमुळे पुराची स्थिती कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी ती ४१.५ फुटांवर राहिली.

यामुळे शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे. दूधगंगा धरणातून सकाळी एक हजार क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आल्याने या नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर दोन दिवसांपासून कमी राहिला आहे. जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली असून, राष्ट्रीय महामार्ग १, राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा १२, ग्रामीण १५ व इतर जिल्हा २० असे ५१ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असल्याने शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. चारचाकी व अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.

शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघडझाप होऊन काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. शहरातील सुतारवाड्यासह सखल भागांतील पाणी अद्याप उतरलेले नाही.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे शुक्रवारी (दि. २०) खुले झाल्याने येथून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दूधगंगा धरणातूनही सकाळी एक हजार क्युसेकने विसर्ग वाढविला; यामुळे एकूण पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून, दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी राजाराम बंधारा येथे ती ४१.५ फुटांवर राहिली.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत शनिवारी सकाळी आठपर्यंत १९.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (५.५०), शिरोळ (२.५७), पन्हाळा (२०.१४), शाहूवाडी (३१.००), राधानगरी (२५.८३), गगनबावडा (४५.५०), करवीर (१२.००), कागल (१२.५७), गडहिंग्लज (८.५७), भुदरगड (२२.४०), आजरा (३१.७५), चंदगड (१६.६६). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर