शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

शिवाजी मंडळाचा दमदार सेंटर हाफ--अशोक चव्हाण

By admin | Updated: February 21, 2017 23:55 IST

वयाच्या सातव्या वर्षापासून फुटबॉल खेळण्यास सुरुवात करून तब्बल २१ वर्षे अशोकला फुटबॉल खेळण्याची मौलिक संधी मिळाली.

एकदा बालगोपाल विरुद्ध शिवाजी या संघांत अत्यंत चुरशीचा सामना होता. त्यात अशोकचा मिडफिल्डचा खेळ अफलातून झाला. सामना ‘शिवाजी’ने जिंंकला. चाहत्यांनी अशोकला उचलून घेतले व शहरातून विजयोत्सव मिरवणूक काढली. अशोक चव्हाण याचा जन्म दि. ७ जुलै १९४७ रोजी गंजी गल्ली, सोमवार पेठ, येथे झाला. लहानपणापासूनच मोठ्यांचा खेळ पाहण्याची उत्कट इच्छाशक्ती. त्यामुळे गल्लीबोळांतील रोज होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अशोक फुटबॉलमध्ये बॅकच्या प्लेसवर तयार होऊ लागला. काका ‘शिवाजी’चे सुप्रसिद्ध खेळाडू. लेप्टआऊट कै. जयसिंंग शं. खांडेकर व कोल्हापूरचे प्रथम महापौर कै. बाबासाहेब कसबेकर, कै. सखारामबापू खराडे यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे अशोक चव्हाण याचा फुटबॉल प्रकाशात आला. वयाच्या सातव्या वर्षापासून फुटबॉल खेळण्यास सुरुवात करून तब्बल २१ वर्षे अशोकला फुटबॉल खेळण्याची मौलिक संधी मिळाली. जयसिंग खांडेकरच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे अशोक शिवाजी तरुण मंडळाच्या सीनिअर संघात सेंटर हाफ या जागेवर दाखल झाला.अशोक चव्हाण एक रूबाबदार व्यक्तिमत्त्व, गोरा रंग, गोलसर चेहरा, माफक उंची, मजबूत हाडपेर, शरीर प्रकृती दणकट. खेळातील सर्व तंत्रे जाणणारा, सेंटर बॅकवर खेळताना नेहमी सतर्क राहून आपल्या सवंगड्यांना बॉल पास करणारा. बॉल कंट्रोलिंंग अचूक. शिवाय बॉलवर हुकूमत प्रभावी. जोरदार किक्स मारण्याची खासियत. ग्राऊंड पासिंंग किंंवा ओव्हरहेड लाँग पासिंंगमध्ये परफेक्ट खेळाडू. पायात कमालीची ताकद. स्टॅमिना व धावगती पुरेपूर.शिवाजी तरुण मंडळातून खेळताना स्थानिक पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा खेळून परगावच्या सांगली, मिरज, गडहिंंग्लज, गारगोटी याठिकाणी अशोकने सेंटर बॅकचा प्रेक्षणीय खेळ व कोल्हापूरचे पाणी दाखवून अनेक स्पर्धा जिंंकल्या आणि तेथील प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. अशोकच्यावेळी त्याचे साथीदार मातब्बर होते. फुटबॉलशिवाय अशोकने (अ‍ॅथलेटिक) रनिंंग स्पर्धेत भाग घेऊन अनेकवेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते. या रनिंंगमध्ये भाग घेतल्याचा फायदा अशोकचे फुटबॉल स्पर्धांतील रनिंंग अधिक वेगवान असे. त्यामुळे बॉल ड्रिबलिंंगच्यावेळी अशोक इतर प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत असे. सामना खेळत असताना त्याच्या उजव्या पायास गुडघ्यावर फ्रॅक्चर झाले होते. त्या काळात अशा दुखापत झालेल्या खेळाडूंचे पाय चोळून बरे करण्याची किमया शिवाजी रोडवर (बिंंदू चौकनजीक) असणाऱ्या बारगीर वस्ताद यांना अवगत होती. कोल्हापुरातील व बाहेरगावच्या कित्येक खेळाडूंचे दुखरे पाय त्यांनी बरे केले आहेत. अशोक चव्हाण याचा पाय पूर्णपणे बारगीर वस्ताद यांनी बरा केला. अशोक चव्हाण आपल्या कारकिर्दीतील एक आठवण सांगताना हरवून जातो. एकदा बालगोपाल विरुद्ध शिवाजी या संघांत सामना होता. अत्यंत चुरशीचा. त्यात अशोकचा मिडफिल्डचा खेळ अफलातून झाला. सामना ‘शिवाजी’ने जिंंकला. मित्रांनी व चाहत्यांनी अशोकला उचलून घेतले व शहरातून विजयोत्सव मिरवणूक काढली. अशोकचा मित्रपरिवार मोठा. शाहू मैदानावर सामने पाहण्याची त्याची खूप इच्छा असते; पण दुर्दैवाने तो पक्षाघातासारख्या आजाराने आज अपंग आहे. ही त्याची शोकांतिका आहे; पण मन मात्र उत्साही आहे. (उद्याच्या अंकात : अनंत खांडेकर)प्रा. डॉ. अभिजित वणिरे