शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्यातील धाडसी तरुणांचा गौरव,पोलिसांकडून प्रशस्तिपत्रक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:33 IST

कोल्हापूर : शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारून तिघांचे जीव वाचविणाºया धाडसी तरुणांचा बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.शिवाजी पुलावरून दि. २६ जानेवारीच्या रात्री मिनीबस कोसळल्याचे समजताच जुना बुधवार पेठ परिसरातील तरुणांनी नदीकडे धाव घेतली. अंधारात स्वत:चा जीव ...

कोल्हापूर : शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारून तिघांचे जीव वाचविणाºया धाडसी तरुणांचा बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

शिवाजी पुलावरून दि. २६ जानेवारीच्या रात्री मिनीबस कोसळल्याचे समजताच जुना बुधवार पेठ परिसरातील तरुणांनी नदीकडे धाव घेतली. अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून तरुणांनी पाण्यात उड्या मारून मनीषा वरखडे, मंदा केदारी, प्राजक्ता नागरे यांचे जीव वाचविले. या अपघातात तेराजण ठार झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तरुणांनी मदतकार्य केले. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले. परंतु जुना बुधवार पेठेतील तरुणांनी तोरस्कर चौकातील कार्यक्रम अर्ध्यावर टाकून सामाजिक बांधीलकी जोपासत अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यामुळेच तीन जीव वाचले, अशा धाडसी तरुणांचा सत्काराचा कार्यक्रम बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पार पडला.

यावेळी पोलीस अधीक्षक मोहिते यांच्या हस्ते मदतकार्यातील तरुणांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मोहिते यांनी, पोलीस सेवेमध्ये असताना अशा प्रकारची मदत मी पहिल्यांदाच पाहिली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसºयांचे प्राण वाचविणाºया शूर वीरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुमचा आम्हाला अभिमान आहे. असेच सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळो. तुमच्या चांगल्या कामामध्ये पोलिसांचे सहकार्य यापुढे नेहमी असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सई भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, आदी उपस्थित होते.यांचा झाला गौरवमाजी उपमहापौर दिगंबर राजाराम फराकटे, प्रवीण सदाशिव डांगे, कुणाल राजेंद्र भोसले, सुशांत किशोर महाडिक, महेश सुकुमार शिंदे, केदार सुकुमार शिंदे, योगेश नंदकुमार यादव, विनायक राजेंद्र फलटणे, बाबासो पाटील, सूरज विजय आडगुळे, प्रताप रमेश मोहिते, राकेश रणजित शिंदे, सागर सदानंद गौड, विनायक काशिनाथ नाईक, शुभम राजेश पोवार, अतीश सुरेश घोलप, संताजी फत्तेसिंगराव घोरपडे, राकेश नंदकुमार तिवले, महेश सलगर, सुभाष संजय चव्हाण, संजय दिनकर चव्हाण, सुभाष रामबिंड.

कोल्हापुरातील शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी मदतकार्य करणाºया तरुणांचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी तिरूपती काकडे, डॉ. प्रशांत अमृतकर, सई भोरे-पाटील, तानाजी सावंत, संजय मोरे, आदी उपस्थित होते.