शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

२००० फुट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ १७५ वर्षानंतर रांगणा किल्ल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 14:08 IST

RangnaFort Tof Kolhapur : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंद व खुशीने डबडबलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जय जिजाऊ, जय शिवाजी! आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्दे बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांचे प्रयत्न आले फळास! गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त !

रमेश वारकेबोरवडे /कागल : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंद व खुशीने डबडबलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जय जिजाऊ, जय शिवाजी! आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत आनंद व्यक्त केला.

अनेक वर्षे जे काम कोणाला जमले नाही ते बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी ग्रुपने करुन दाखवले. याबद्दल त्यांंच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही  तोफ किल्ल्यावरील निंबाळकर वाड्याशेजारी ठेवली आहे. या मोहिमेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे महादेव फराकटे यांच्या हस्ते तोफेचे पूजन करण्यात आले. अखेर पावणे दोनशे वर्षाच्या खडतर वनवासानंतर ही तोफ रांगणा किल्ल्याच्या कुशित विसावली. घनदाट जंगल,वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांचा अभाव, दरीत उतरण्यासाठी फक्त पायवाट, केवळ हाताने चेन ब्लॉक ओढण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा खडतर परिस्थितीतून जीव धोक्यात घालून मार्ग काढत ऐतिहासिक रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ गडावर आणण्यात यश मिळाले.भुदरगड तालुक्यातील रांगणा ऊर्फ प्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली ही तोफ अंदाजे अडीच टन वजनाची आहे. ही तोफ बोरवडे ( ता.कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांनी अथक प्रयत्नाने दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. आता अनेक वर्षांनंतर या तोफा शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.या गडाच्या पायथ्याशी सुमारे २००० फुट खोल दरीत अशी एक तोफ असल्याची माहिती बोरवडे ( ता. कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांना आणि त्रिवेणी ग्रुपचे प्रमुख बोरवडेतील उद्योजक महादेव फराकटे यांना समजली. त्यांनी ही तोफ दरीतून गडावर आणण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गडावर भेट देऊन आवश्यक साहित्याची जमवाजमव केली.यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आणि प्रोत्साहन महादेव फराकटे यांनी दिले.

चालू वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट दरीत उतरुन ही तोफ बाहेर काढण्यास प्रारंभ केला.मोठमोठे दगडगोटे आणि झाडेझुडपे पार करत ते तोफेपर्यंत पोहचले. त्यानंतर गेली दोन महिने या तरुणांनी अथक परिश्रम करित अखेर ही तोफ १५ एप्रिल रोजी गडावर आणण्यात यश मिळविले आहे.तोफ वर काढत असताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि जय शिवाजीच्या घोषात अगदी उत्साहात तोफ वर खेचण्याचे काम एकसारखे सुरु होते.दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर गडावर तोफ आल्यावर शिवरायांचा जयघोष करित या तरुणांनी आनंद व्यक्त केला. या मोहिमेत १३ कायमस्वरुपी युवक आठवड्यातून तीन दिवस सहभागी झाले होते.

यामध्ये सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे ( मडीलगे खुर्द ),प्रविण पाटील ( बिद्री ), शरद फराकटे , नेताजी साठे ,चंद्रकांत वारके ,राहुल मगदूम, मेजर सुनील फराकटे, निखिल परीट,अमर सातपुते, अरुण मगदूम, रघुनाथ वारके ( कासारवाडा ) , प्रज्योत चव्हाण, नेताजी सुर्यवंशी,अवधूत पाटिल ( खानापूर ), तानाजी साठे, भाऊ साठे, बजरंग मांडवकर ( वाळवे खुर्द ), अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील या शिवप्रेमीनी सहभाग घेतला.

आम्ही कठीण परिस्थितीतही यशाला गवसणी घातली असून नैस​र्गिक परिस्थितीचा विचार करता या तोफेचा शोध घेणे एक आव्हान होते. मात्र, घनदाट जंगल आणि शेकडो किलो वजनाची ही तोफ वर आणणे अशक्यप्राय गोष्ट. यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.त्रिवेणी ग्रुपच्या सदस्यांनी महादेव फराकटे यांच्या सहकार्याने रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी दरीत उतरत तोफेचा शोध सुरु केला आणि दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तोफ गडावर आणण्यात या तरुणांना यश आले. दरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांनी पाठीला पाण्याच्या बॉटल बांधून ते दरीत उतरले होते. या यशस्वी मोहिमेनंतर त्रिवेणी गुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.- सुनिल वारके, प्रविण पाटील,सदस्य, रांगणा त्रिवेणी ग्रुप.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर