शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यू; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:18 IST

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण असणाऱ्या ‘बादल’ या अश्वाचा सोमवारी मृत्यू झाला. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यूशिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण

कोल्हापूर : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण असणाऱ्या ‘बादल’ या अश्वाचा सोमवारी मृत्यू झाला. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.येथील पांजरपोळमधील संजय बागल यांच्या कुटुंबामध्ये ११ वर्षांपूर्वी बादल हा अश्व दाखल झाला. विविध स्पर्धा, उत्सव, सणांसाठी त्याला बागल यांनी तयार केले. गेल्या सात वर्षांपासून हा अश्व किल्ले रायगडावर जूनमध्ये होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होत होता. तो पायऱ्यांवरून चढून गडावर जात होता. राज्यभरातील शिवभक्तांचा तो लाडका होता.

विविध स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. बादल हा कोल्हापूरची एक वेगळी ओळख बनला होता. त्याला गेल्या तीन दिवसांपूर्वी ताप आला. हा ताप त्याच्या मेंदूपर्यंत गेला. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, माझी मुलगी प्राजक्ता हिच्या वाढदिवसानिमित्त नृसिंहवाडी येथून सन २००७ मध्ये ‘बादल’ची खरेदी केली. आमच्या कुुटुंबातील तो सदस्य बनला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. बादलची स्मृती कायम राहावी म्हणून नवीन अश्व आणणार असल्याचे संजय बागल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaigadरायगड