शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिव साहाय्यता केंद्र करणार आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:35 IST

आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देशिव साहाय्यता केंद्र करणार आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनशिवाजी विद्यापीठाचा उपक्रम; पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, विद्यापीठाने शिव साहाय्यता केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. महापुरासारख्या आपत्तीच्या क्षणी अशा प्रशिक्षित मनुष्यबळाचा शासन व प्रशासनाला निश्चितपणे सकारात्मक उपयोग होत असतो. त्या दृष्टीने या केंद्राला मोठे महत्त्व आहे.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागांत यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता, भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जागृती व आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या मार्गदर्शनासाठी विद्यापीठाने शिव साहाय्यता केंद्रांतर्गत आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचे ठरविले.

या केंद्राला, त्याच्या प्रारूप आराखड्याला आणि आनुषंगिक पदनिर्मितीसाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. केंद्राच्या कार्यवाहीसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.

या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक संजय परमणे, सिनेट सदस्य पंकज मेहता, उपस्थित होते.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर