शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:38 IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच राज्य शासन पेट्रोलवर आकारत असलेल्या कराचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. राज्यात पेट्रोल प्रतिलीटर ८० रुपयांच्या घरात गेले आहे. याबाबींचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने या मोर्चाचे आयोजन केले होते.मोर्चात शिवसैनिक बैलगाड्यातून सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली, ‘सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणाºया शासनाचा धिक्कार असो’, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी झालेल्या सभेत आमदार क्षीरसागर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला गाजर दाखविले तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेला गाजर दाखवत आहेत, असे क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना