शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

शिवसेनेची घोषणाबाजी अन् निदर्शने

By admin | Updated: September 4, 2015 00:56 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर : निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी

कोल्हापूर : शासनाच्या विविध खात्यांतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण संपत्तीची व मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.शिवसैनिक दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. शहरातील सहायक नगररचना कार्यालयसुद्धा यामध्ये मागे नाही. या कार्यालयातील बाबू लोकांच्या खासगीतील व मर्जीतील काही ठरावीक व्यक्ती की ज्यांचा या कार्यालयाशी काहीही संबंध नाही, त्यांची मात्र या कार्यालयांमध्ये रेलचेल असते. त्यांच्या आधाराने हे बाबू लोक काम करतात. सांकेतिक भाषा किंवा चिन्हातून हे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार पूर्ण केले जातात. यामध्ये महापालिकेचे तत्कालीन सहायक संचालक (नगररचना) राठोड व महादेव फुलारी यांच्या कामांची व त्यांच्या मालमत्तेची ‘लाचलुचपत’ विभागाकडून चौकशी व्हावी.कोल्हापूर महानगरपालिका, सहकार विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल खाते व उत्पादन शुल्क या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन महिन्यांतून एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. कोल्हापूर भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भात योग्य त्या सक्त सूचना द्याव्यात व त्याची अंमलबजावणी करावी. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती जाहीर करण्यासंदर्भात तातडीने आदेश द्यावेत. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवावे. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामांचा निपटारा करण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील शासनाच्या विविध खात्यांतील वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण संपत्तीची व मालमत्तेची चौकशी ‘लाचलुचपत’ विभागामार्फत होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. अशा निवृत्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून पर्दाफाश करावा. यामुळे जनतेला कळेल की, या सर्व अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मार्गाने मिळविलेल्या संपत्तीतून एखादे मोठे धरण बांधून पूर्ण होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात दिलीप पाटील-कावणेकर, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, शशी बिडकर, हर्षल सुर्वे, राजू यादव, विराज पाटील, सुजित चव्हाण, रणजित आयरेकर, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, अभिजित बुकशेठ, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)आरोप...जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे.मर्जीतील खासगी व्यक्तीचा कार्यालयात वावर; त्यांच्या आधाराने सरकारी बाबूंचे कामकाज चालते.सांकेतिक भाषा किंवा चिन्हाद्वारे चालतो ‘अर्थ’पूर्ण व्यवहारसहायक नगररचना कार्यालयातही भ्रष्टाचार