शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना अधिवेशन स्थळी नोंदणीला गर्दी; महाधिवेशनाचा प्रारंभ होणार

By समीर देशपांडे | Updated: February 16, 2024 11:39 IST

शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये नोंदणीसाठी शिवसैनिका पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोल्हापूर : शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये नोंदणीसाठी शिवसैनिका पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळामध्ये कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये या महाधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.

या अधिवेशनासाठी गुरुवारपासूनच राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, कार्यकारणी मधील पदाधिकारी दाखल झालेले आहेत  अधिवेशनाच्या प्रारंभानंतर संघटनात्मक विषय चर्चेला घेण्यात येणार असून भोजनानंतर राजकीय विषयावर चर्चा होणार आहे संध्याकाळी सहा नंतर सरकारी योजना याविषयी कार्यशाळा होणार असून संध्याकाळी सात नंतर मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरणाला उपस्थित राहणार असून याचवेळी ते शहरातील प्रमुख काही संघटनांशी चर्चा करणार आहेत.

अधिवेशन आणि शहर परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यासह नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे मोठे कट आउट उभारण्यात आले असून पूर्ण शहर हे भगव्या झेंड्याने सुशोभित करण्यात आलेले आहे. अधिवेशनाच्या प्रवेशालाच महाराष्ट्रातील विविध विभागांच्या नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी कोकण, मुंबई, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ असे वेगवेगळे विभाग करण्यात आले असून यामध्ये नोंदणी केलेल्या पदाधिकाऱ्यांना आयकार्ड, शिवसेनेचा मफलर, नोटपॅड असे साहित्य देऊन मुख्य मंडपामध्ये पाठवण्यात येत आहे. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.