आजरा : आजरा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ आजरा येथील शिवसेना शाखेत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते झाले. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ ही संकल्पना राबवून आजरा तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी उच्चांकी करावी व शिवसेना घराघरात पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने १ ऑगस्टपासून ‘माझे गाव : कोरोनामुक्त गाव’ हे अभियान राबवावे व प्रत्येक गाव कोरोनामुक्त करावे, असेही आवाहन देवणे यांनी केले. यावेळी नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. संभाजी पाटील, दीनानाथ चौगुले, राजेंद्र सावंत, युवराज पोवार, ओंकार माद्याळकर, प्रतीक क्षीरसागर, दिनेश कुंभीकर, महेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळी : आजऱ्यात शिवसंपर्क अभियानाचा फित कापून विजय देवणे यांनी प्रारंभ केला. यावेळी संभाजी पाटील, राजेंद्र सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
क्रमांक : १८०७२०२१-गड-०४