शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक आक्रमक, सीमेवर कर्नाटक तपासणी नाक्यावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 12:21 IST

Shiv Sena Kagal Karnatka Kolhapur : कर्नाटक सरकारने कोरोना तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी, अशी मागणी घेऊन कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या तपासणी नाक्यावर जोरदार अंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसीमेवर कर्नाटक तपासणी नाक्यावर आंदोलन शिवसैनिक आक्रमक, कागल पोलीसांनी घेतले ताब्यात

जहॉगीर शेखकागल : कर्नाटक शासनाने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दुधगंगा नदी पुला लगत तपासणी नाका उभारून कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय एकही प्रवासी वाहन न सोडण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावातील गावांना बसत आहे. कर्नाटक सरकारने ही तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी. अशी मागणी घेऊन कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या तपासणी नाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले.कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न तसेच कर्नाटकातुन महाराष्ट्रात येणारी कर्नाटक पासींग वाहने आडवीण्याचा प्रयत्न करणारया शिवसेना जिल्हा प्रमुख विजयराव देवणे, संजय पवार , तालुका प्रमुख अशोक पाटील, दत्ता सावंत, विद्या गिरी, वैभव आडके, यांच्यासह पंधरा ते सोळा शिवसैनिकांना कागल पोलीसांनी ताब्यात घेतले.सीमा भागातील अनेक गावात जाण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोकांना कर्नाटक हद्दीतील महामार्गावरूनच जावे लागते.तसेच कोकण आणि गोव्याला जातांनाही हाच मुख्य मार्ग आहे. कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने कोरोना अहवालाची सक्ती केली आहे .त्यातुन या भागात संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील एकाही वाहनाला महाराष्ट्रात प्रवेश देणार नाही. अशी भुमीका शिवसेने घेतली.या वेळी कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनीही पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. पण आम्हाला वरून आदेश आहेत. आम्ही यात बदल करू शकत नाही. असे कर्नाटक पोलीसांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटकkagal-acकागलcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर