शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळी रविवारपासून: पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवारी (दि. २६) प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात ...

ठळक मुद्देशिवभोजन थाळी रविवारपासून, पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर होणार सुरू, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवारी (दि. २६) प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात चार ठिकाणी शिवभोजन थाळी या योजनेची सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, कोल्हापूरसाठी ६०० थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार १५० थाळ्यांप्रमाणे चार जणांना ठेका देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज, कपिलतीर्थ मार्केट येथील महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, सावित्रीबाई फुले रुग्णालयानजीकच्या रुद्राक्ष स्वयंम महिला बचत गट, साईक्स एक्स्टेंशन परिसरातील हॉटेल साईराज यांचा समावेश आहे. यासाठी ३० हून अधिक अर्ज आले होते; परंतु शासनाच्या निकषांत न बसल्याने या चार जणांना ठेका देण्याचे निश्चित करण्यात आले. याची वर्कआॅर्डर जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली. तत्पूर्वी १६ जानेवारीला संंबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या योजनेनुसार संबंधितांनी दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळीचे वितरण करायचे आहे. कमीत कमी ७५ ते जास्तीत जास्त १५० थाळींचे उद्दिष्ट राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.============================प्रधान सचिवांनी घेतला आढावाशिवभोजन थाळी योजनेसंदर्भात सोमवारी राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी)द्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, संबंधितांना वर्कआॅर्डरही देण्यात आल्याचे सांगितले.==========================================‘अ‍ॅप’द्वारे होणार थाळ्यांची नोंदणीशिवभोजन थाळी योजनेसाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. यामध्ये संबंधितांकडून किती थाळ्यांची विक्री झाली याची नोंदणी आॅनलाईनद्वारे मंत्रालयात समजणार आहे.=-==================================(प्रवीण देसाई)

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर