शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरगावच्या वीर माता-पित्याची जगण्यासाठी फरफट : शासकीय मदत, लाभ घेऊन वीरपत्नी रमली नव्या संसारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:50 IST

जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील असणाऱ्या काळूचेक येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात शहीद झालेला शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा जवान विजय आनंदा सावंत यांच्या वीर माता-पित्याची फरफट सुरू आहे.

ठळक मुद्देगतीमंद मुलासह हालाखीचे जिणे; हक्कापासून ठेवले वंचीत
<p>दीपक जाधव ।कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील असणाऱ्या काळूचेक येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात शहीद झालेला शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा जवान विजय आनंदा सावंत यांच्या वीर माता-पित्याची फरफट सुरू आहे.या २३ वर्षांच्या जवानास १९ जुलै २००७ च्या रात्री वीरमरण आले. विजय सावंत हे सन २००२ मध्ये ११३ इंजिनिअरिंंग रेजिमेंटमधून जम्मू येथे दाखल झाले. शहीद झाले तेव्हा त्यांचे लग्न होऊन फक्त दोनच महिने झाले होते. संसार फुलण्याआधीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. कुटुंबातील कमविता विजय शहीद झाल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला. एखादा जवान देशासाठी शहीद झाला तर त्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. मात्र, विजयचे लग्न झाले असल्याने ही मदत व शासकीय लाभ पत्नीला मिळाले. पत्नीने २०११ ला पुनर्विवाह केल्याने त्यांचे नवे आयुष्य सुरू झाले; परंतु त्यामुळे मूळचे सावंत कुटुंब उघड्यावर पडले. वडील व भाऊ गतिमंद व आईचे वय झाल्यामुळे त्यांनाही शेती किंवा उपजीविकेसाठी काम करता येत नाही. त्यांची ही परवड चुलतभाऊ सचिन सावंत यांनी ‘फेसबुक’च्या ‘आम्ही कोल्हापुरी’ ग्रुपवर शेअर केली. ती वाचून ‘लोकमत’ने त्यांच्या गावास भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. विजयची पत्नी पूर्वी त्याच्या आई-वडिलांना महिन्याला पेन्शनमधील ३००० रुपये देत असे; परंतु कौटुंबिक वाद झाल्यानंतर गेली दोन वर्षे ही रक्कम मिळाली नसल्याचे आक्काताई सावंत यांनी सांगितले.विजयच्या चुलत्यांनी कोल्हापुरातील सैनिक कल्याण कार्यालयात याबद्दल चौकशी केली; परंतु त्यांना तिथे कुणी दाद लागू दिली नाही. सध्या या कुटुंबाला शासकीय मदतीची गरज असून, ज्या वीर माता-पित्याने या भारतमातेसाठी मुलगा अर्पण केला, त्यांच्याच जगण्याची आज परवड होत आहे. त्यांना चुलते व त्यांची मुले थोडी मदत करतात; पण हक्काची मदत असताना दुसºयांकडे किती दिवस हात पसरायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात आहे. शिरगाव हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून, प्रत्येक घरातील एक तरुण सैन्यात आहे.नक्की मदत करू : सुभाष सासने‘लोकमत’ने ही बाब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांना सांगितली. त्यांनी विजयच्या आई-वडिलांनी त्यासंबंधीची रीतसर तक्रार व आवश्यक कागदपत्रे दिल्यास पेन्शनची निम्मी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.