शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात शिरोली पोलिसांनी वाचविले ३० जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

सतीश पाटील शिरोली : महापुराच्या काळात शिरोली पोलिसांनी तब्बल ७५ तास रस्त्यावर उभे राहत सेवा तर दिलीच, शिवाय महापुराच्या ...

सतीश पाटील

शिरोली : महापुराच्या काळात शिरोली पोलिसांनी तब्बल ७५ तास रस्त्यावर उभे राहत सेवा तर दिलीच, शिवाय महापुराच्या पाण्यात बुडणाऱ्या ३० जणांचे जीव वाचवित सद‌‌रक्षणाय खलनिग्रहणाय हे खाकीचे ब्रीदही प्रत्यक्ष सत्यात उतरवले आहे. मुसळधार अतिवृष्टीने कोल्हापूरला झोडपून काढले. पंचगंगा नदीने २२जुलै रोजी रात्री १२ वाजता धोका ‌‌पातळी ओलांडली. रात्रीभर धडकी भरणारा पाऊस पडल्याने पंचगंगा नदीला पूर आला.‌ २३ जुलै शुक्रवारी सकाळी पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा मार्गावर पाणी आल्याने शिरोली पोलिसांनी महामार्गाचा ताबा घेतला. शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिरोली पोलीस डोळ्यात तेल घालून येथील वाहतुकीवर लक्ष देत होते. त्यातच पाणीपातळी वाढल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने पाणी आले. त्यातच तावडे हॉटेलजवळ पोलीस नसल्याने कोल्हापूरकडून शिरोलीकडे येणारी वाहतूक सुरू होती. त्यामुुळे महामार्गावर पाणी येऊनही अनेक वाहनचालक पुराच्या पाण्यातून वाहने घालत होते. मात्र, पाणी अचानक वाढल्याने अनेक दुचाकीस्वार वाहत जात असल्याचे लक्षात आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी पोलीस कर्मचारी अविनाश पोवार, सतीश जंगम, महेश अंबी, समीर शेख, प्रशांत काटकर, विजय ठाकूर,जी एम मीरखा, नीलेश कांबळे, विनोद कुरणे,नजीर शेख,महेश घाटगे, रमेश कुंभार, यांनी महामार्गावर मानवी साखळी करत पाण्याच्या प्रवाहातून कोल्हापूरच्या दिशेने जात ३० प्रवाशांना वाचवले. शिरोली पोलिसांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

चौकट :

महामार्गावरील महापुराचे पाणी पूर्णपणे ओसरेपर्यंत शिरोली पोलिसांनी महामार्गावर ठिय्या मांडला होता. महापुरातून बोटीतून येणाऱ्या अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे कामगिरीही शिरोली पोलिसांनी केली. विशेष म्हणजे पुराचे पाणी कमी होत असल्याचे दिसताच महामार्ग सुरू करण्यासाठीची चाचणी घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले हे स्वतः जेसीबी मशीन घेऊन पाण्यात उतरले होते.

फोटो : २९ शिरोली पोलीस सत्कार

ओळी १) महापुराच्या काळात शिरोली येथे महामार्गावर तब्बल ७५ तास काम करणारे शिरोलीचे जिगरबाज पोलीस. सोबत जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व टीम.

२९ शिरोली किरण भोसले. २)बोटीतून बाहेर घेताना लहान बाळाला घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले.