शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ विधानसभा : राजकीय वातावरण तापू लागले

By admin | Updated: July 24, 2014 23:39 IST

मतदारसंघातून व्यूहरचना

संदीप बावचे - शिरोळ- शिरोळ विधानसभा मतदारसंघावर महायुतीतील स्वाभिमानी, शिवसेना, भाजपकडून स्वतंत्रपणे दावा केला जात आहे; तर राष्ट्रवादी पक्षानेही शिरोळ मतदारसंघातून व्यूहरचना आखली आहे. यातच विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे असले तरी ‘दत्त’ कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता तालुक्यातील विधानसभेचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिरोळ मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असून, यावेळी विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील हे निवडणूक लढविणार का, याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय गणिते मांडली जात आहेत. शिरोळ विधानसभेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे; तर विधानसभेची ही जागा भाजपला मिळावी, याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आपला हक्क या मतदारसंघावर सांगत असून, ‘स्वाभिमानी’कडून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकर मादनाईक व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील या दोघांनीही आपली प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. खासदार राजू शेट्टी हे कोणाला उमेदवारी देतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे. कॉँग्रेसकडून ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील हे वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नात आहेत; तर राष्ट्रवादीने स्वबळाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघातून शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठविले आहे. जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनीही नुकताच तालुक्यात दौरा करून चाचपणी केली आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात राजकीय तर्क-वितर्कांचा महापूर आला असून, येणाऱ्या काही दिवसांत विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतरच शिरोळमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.