शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच चालवतोय दवाखान्याचा कारभार !

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

‘अडकूर’चा दवाखाना अधिकाऱ्यांविनाच : पशुमालकांची गैरसोय; औषधांचाही तुटवडा

विजयकुमार कांबळे - अडकूर (ता. चंदगड) येथील जनावरांचा दवाखाना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच असून, शिपाईच पाहतोय ‘श्रेणी - १’च्या दवाखान्याचा कारभार. त्यामुळे बिचाऱ्या मुक्या जनावरांना उपचाराविना प्राणास मुकावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.चंदगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून अडकूरची ओळख आहे. भाजीपाल्याबरोबरच जनावरांचा बाजारही प्रसिद्ध आहे. म्हणून येथे चंदगड-आजरा-गडहिंग्लजसह कर्नाटकाहूनही व्यापारी मोठ्या संख्येने येतात. जनावरांची खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात केली जाते. बुधवारचा आठवडा बाजार असल्याने दवाखान्यातही मोठी गर्दी होते. यावेळी गाभण तपासणी, रेडे, बैल व बोकडांचे खच्चीकरण करण्यासाठी गर्दी होेते. तसेच जनावरांना बिल्ले मारणे यासाठी श्रेणी-१च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच प्रामुख्याने गरज असते. मात्र, वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने पशुमालकांना ताटकळत बसण्याची वेळ येत आहे.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आहे. भरपूर दूध देणाऱ्या संकरित गायी-म्हशी लाखो रुपये देऊन आणल्या जात आहेत, तसेच नवीन संकरित कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म व शेळ्या-मेंढ्यांचे मोठ्या प्रमाणात पालनही पहायला मिळत आहे. तसेच शासनाच्या अनेक योजना आहेत.डॉक्टरच वेळेत हजर नसल्याने शासनाच्या विविध योजनेच्या लाभाविनाच वंचित राहण्याची वेळ गोरगरीब पशुपालकांवर आली आहे. असुलभ प्रसूती, मायांग बाहेर येणे तसेच घटसर्प, फऱ्या, लाळखुरकत या संसर्गजन्य साथीच्या आजारांत जनावरांना वेळेत उपचार न झाल्यास प्राण गमवावा लागतो आहे, तर अनेक कारणांनी मृत झालेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या डॉक्टरांची वाट पहावी लागते.एवढेच नव्हे, तर दवाखान्यात खांदमलम तसेच इतर औषधांचा तुटवडाही असल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरच वेळेत उपलब्ध नसल्याने दवाखान्यालाच उतरती कळा लागली की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दवाखान्याच्या आवारात गेट नाही, येथे असणारा खोडाही मोडलेल्या स्थितीत असल्याने त्याचीच जखम जनावरांना अधिक होईल का, अशी भीती व्यक्त होत आहे. असे हे किती दिवस चालणार? शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी कुणाचा आधार घ्यायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.दोन वर्षे वैद्यकीय अधिकारीपद रिक्तआमरोळी, अडकूर, उत्साळी, केरवडे, सातवणे पंचक्रोशीसह २२ गावांचा समावेश असलेल्या श्रेणी १ या दवाखान्यात मात्र गेले दीड ते दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून, त्याठिकाणी प्रभारी म्हणून डॉ. एस. पी. पेडणेकर काम पाहत आहेत. मात्र, डॉ. पेडणेकर वेळेत उपलब्ध नसल्याने गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन वेळेत होत नसून, त्यामुळे वांझ प्रमाण वाढण्याची भीती निर्माण होत आहे.दोन वर्षे वैद्यकीय अधिकारीपद रिक्तआमरोळी, अडकूर, उत्साळी, केरवडे, सातवणे पंचक्रोशीसह २२ गावांचा समावेश असलेल्या श्रेणी १ या दवाखान्यात मात्र गेले दीड ते दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून, त्याठिकाणी प्रभारी म्हणून डॉ. एस. पी. पेडणेकर काम पाहत आहेत. मात्र, डॉ. पेडणेकर वेळेत उपलब्ध नसल्याने गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन वेळेत होत नसून, त्यामुळे वांझ प्रमाण वाढण्याची भीती निर्माण होत आहे.