शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

आजऱ्यात राष्ट्रवादीसह शिंपी गटात उत्साह

By admin | Updated: August 30, 2015 23:05 IST

जयवंतराव शिंपींचे राजकीय पुनर्वसन : तालुका संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजयाने बळ

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -तडजोडीच्या राजकारणात नकळतपणे घेतल्या गेलेल्या एखाद्या निर्णयाची इतकी मोठी किंमत मोजावी लागते की, जवळचेही दूर जातात. अपयशाची परंपरा सुरू होते, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पुन्हा संधीची वाट पाहणे एवढेच हाती राहते आणि ती संधी मिळाल्यावर पुन्हा राजकीय पटलावर मनाजोगे फासे पडू लागतात असाच काहीसा प्रकार जयवंतराव शिंपी यांच्याबाबत घडला. तालुका संघ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील विजयाने केवळ जयवंतरावांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही, तर राष्ट्रवादीचेही ‘बळ’ वाढले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. गत जिल्हा बँक निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही उमेदवारी ऐनवेळी काशीनाथअण्णा यांना दिली आणि राजकीय पिछेहाट स्वत:हून ओढवून घेतली. बळिरामदादांचा शब्द डावलायचा नाही म्हणून उमेदवारीसह ठरावांची रसदही काशीनाथअण्णा चराटी यांना पुरविली. दुर्दैवाने काशीनाथअण्णा, बळिरामदादांचे निधन झाले. याचा फटका जयवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीस बसला. वरिष्ठ नेत्यांनी काशीनाथअण्णांच्या जागी जिल्हा बँकेत अशोकअण्णांची वर्णी लावली. आणि नवीन राजकीय समीकरणात विरोधक वाढले ते एकवटले.एकीकडे कारखान्याच्या अडचणी वाढत असतानाच दुसरीकडे राजकीय खिंडीत पकडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी झाले. कारखाना, जिल्हा परिषद येथे एकतर्फी लढत देऊन निसटत्या पराभवांना सामोरे जावे लागले. तालुक्यात सर्वांत प्रबळ असणाऱ्या ‘शिंपी’ गटाची मोडतोड झाली. आघाड्यांचे नवीन राजकारण तालुक्यात अस्तित्वात आले. राजू पोतनीस, प्रकाश कुंभार यांच्यासारखे खंदे समर्थक विरोधकांच्या छावणीत दाखल झाले. होणाऱ्या सर्व घडामोडी शांतपणे पाहत जयवंतरावांनी तब्बल साडेचार वर्षे राजकीय वनवास भोगला. राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या कुरबुरींचा परिणाम म्हणून के. पी. पाटलांना आमदारकी गमवावी लागली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना राष्ट्रवादीलाही नेटक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज भासू लागली. राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनी जयवंतरावांना जवळ केले. जयवंतरावांनाही फायदा झाला. राष्ट्रवादीचेही बळ वाढले. जयवंतरावांची अपयशाची मालिका खंडित झाली.जनता बँक आणि साखर कारखान्यात सक्षम पॅनेल बनण्यास ‘जयवंतराव’ नावाचे वलय राष्ट्रवादीला उपयोगी ठरणार आहे. उतावळेपणामुळे तालुक्यातील अनेकांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येत असताना संयमाने राजकारण करणाऱ्या जयवंतरावांना मात्र पुन्हा ‘लिफ्ट’ मिळत आहे.