शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

शेट्टी, महाडिक, सतेज पाटील यांच्यात जुगलबंदी-तिघांचे एकमेकांना टोमणे-साधली प्रचाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:09 IST

रेशनधारकांनी गुरुवारी कोल्हापुरात काढलेल्या विराट मोर्चाने प्रशासनाला कितपत धडकी भरवली, हा भाग वेगळा, पण प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र तातडीने मोर्चाचे व्यासपीठ गाठत पाठिंबा जाहीर करत, प्रचाराची आयती संधी साधली

ठळक मुद्देमोर्चात पाठिंब्यासाठी व्यासपीठावर राजकीय नेत्यांची गर्दीसतेज पाटील व धनंजय महाडिक एकापाठोपाठ व्यासपीठावर आले-दोघांच्यामध्ये चंद्रकांत यादव

कोल्हापूर : रेशनधारकांनी गुरुवारी कोल्हापुरात काढलेल्या विराट मोर्चाने प्रशासनाला कितपत धडकी भरवली, हा भाग वेगळा, पण प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र तातडीने मोर्चाचे व्यासपीठ गाठत पाठिंबा जाहीर करत, प्रचाराची आयती संधी साधली. या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनी भाषणातून मारलेल्या टोमण्यांमुळे राजकीय जुगलबंदीचा अनुभव उपस्थितांनी घेतला.

रेशन बचाव समितीने काढलेला मोर्चा अपेक्षेपेक्षाही अतिभव्य झाला. जिल्ह्यातील सर्व भागांतून रेशनधारक यात सहभागी झाल्याने कोल्हापूर गर्दीने तुंबून गेले. मोर्चा ऐन भरात असताना, आमदार हसन मुश्रीफ यांच्या वतीने नवीद मुश्रीफ व भैय्या माने यांनी व्यासपीठावर येऊन पाठिंबा दर्शवला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी थेट व्यासपीठावर एन्ट्री केली. पाठोपाठ पाच मिनिटांच्या अंतराने आमदार सतेज पाटील हे दाखल झाले. आणखी थोड्या वेळाने खासदार राजू शेट्टींचेही आगमन झाले. मोर्चा संपत असतानाच माजी आमदार पी. एन. पाटील यांचा निरोप घेऊन गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व अरुण डोंगळे हेदेखील व्यासपीठावर आले. भाजप वगळता सर्व पक्षांच्या आमदारांचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते व्यासपीठावर दाखल झाले. या सर्वांनी तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत लढ्याला पाठिंबा दर्शवला.

पाठिंब्यावरून सभेत राजकीय नेत्यांची गर्दी झाली, तरी सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी मी शब्द देणारा खासदार आहे, नुसता बोलणारा नव्हे, तर करून दाखविणारा आहे. मी संसदेत काय बोलतो, याची क्लिपदेखील तुमच्या मोबाईलवर पाठवतो, असे सांगून चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. महाडिक परिवार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात लोकसभेत प्रश्न मांडून कोण ऐकणार नाही.

खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी याच न्यायाने येथून पुढे परिवर्तनाची लढाई लढावी लागेल. आता लढण्यासाठी तलवार काढलीच आहे, तर ती खाली ठेवायची नाही. रात्री १२ वाजता जरी बोलावले, तरी बंटी पाटील तुमच्या मदतीला येईल, असे सांगून महाडिकांवर कडी करण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या जुगलबंदीने उपस्थितांचे मनोरंजन केले असताना, त्यात खासदार राजू शेट्टी यांनीही उडी घेतली. भाषण करून क्रांती होत नाही, प्रश्न सुटत नाहीत. वेळप्रसंगी नरड्यावर पाय ठेवण्याची तयारी ठेवावी लागते, याचेही भान ठेवावे, असा टोमणा मारला.सतेज पाटील व धनंजय महाडिक एकापाठोपाठ व्यासपीठावर आले. व्यासपीठावर या दोघांच्यामध्ये चंद्रकांत यादव बसले होते. या दोघांनी एकमेकांकडे साधा कटाक्षसुद्धा टाकला नाही. मोर्चा संपल्यानंतर महाडिक निघून गेले, पण सतेज पाटील व राजू शेट्टी हे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले. तेथून बाहेर पडल्यानंतर सतेज पाटील यांच्या गाडीतूनच शेट्टी निघून गेले.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर