शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

शेट्टी-हाळवणकर यांच्यात दुरावा

By admin | Updated: May 15, 2015 23:36 IST

कुरघोडीचे राजकारण : भाजप-स्वाभिमानी संघटनेतील राजकीय स्थित्यंतराची परिणती

राजाराम पाटील - इचलकरंजी -भाजपकडून राजकीय कोंडी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या भेटीप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर यांना साधे निमंत्रणही न देता खासदार शेट्टी यांनी प्रथमच स्थानिक राजकारणात कुरघोडी केली. त्यामुळे शहर व परिसरातील वस्त्रोद्योग व राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.इचलकरंजी लोकसभा व विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे खासदार शेट्टी व आमदार हाळवणकर यांची दुसरी टर्म आहे. दोन्हीही निवडणुकीत दोघांचीही भूमिका एकमेकाला पुरक अशीच राहिली आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमध्ये आघाडी होती. लोकसभा निवडणुकीत हाळवणकर यांनी मतदारसंघात पदयात्रा व सभा घेऊन विधानसभा मतदारसंघ ढवळून काढला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांनीही हाळवणकर यांचा जातीने प्रचार केला आणि कार्यकर्तेही दिमतीला दिले होते.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात दोघांचीही भूमिका समन्वयाची राहिली आहे. वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग या विषयांत तर खासदार शेट्टी हे आमदार हाळवणकर यांची एक तज्ज्ञ म्हणून नेहमीच मदत घेतात. आमदार हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास आघाडी इचलकरंजी नगरपालिका व चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी व तारदाळ येथे कार्यरत आहे. म्हणून शेट्टी यांनी शहर विकास आघाडी ‘त्रस्थ’ होईल, अशा राजकीय हालचाली कधीही केल्या नाहीत.वरिष्ठ स्तरावरील राजकारणात मात्र भाजपकडून खासदार शेट्टी व त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चांगलीच कोंडी झाली आहे. केंद्रातील आणि राज्यातील मंत्रिपद, विधान परिषदेवरील सदस्यांच्या नेमणुका, शेतकऱ्यांचा नेता म्हणून उच्च पातळीवरून दखल घेणे, अशा परिस्थितीबाबत भाजपकडून ‘शेट्टीं’कडे दुर्लक्षच झाले आहे.११ मे रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत खासदार शरद पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार प्रभाकर कोरे, नरेंद्र मुरकुंबी, मनोहर जोशी, आदींची साखर कारखान्यांच्या अडचणी व शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर या विषयांवर बैठक झाली. खासदार शेट्टी हे ऊसकरी शेतकऱ्यांचे नेते असूनही त्यांना डावलण्यात आले.अशा पार्श्वभूमीवर गुरूवारी खासदार शेट्टी यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष तूपकर यांना वेताळ पेठेतील यंत्रमाग महामंडळाच्या कार्यालयात घेऊन आले. अध्यक्ष तूपकर यांनी पत्रकार बैठक घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुमारे दीड तासांहून अधिक वेळ तूपकर येथे होते; पण त्यांची भेट यंत्रमाग क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले आमदार हाळवणकरांशी घडवून द्यावी, असे काही खासदार शेट्टी यांना वाटले नाही आणि नेमकी हीच बाब राजकीय क्षेत्रात खटकली आहे. खासदार शेट्टी यांनी यंत्रमागाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या विषयावर आमदार हाळवणकर यांना डावलले आणि ‘भाजप’बाबत दुरावा स्पष्ट झाल्याची येथे जोरदार चर्चा आहे.