शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या नावाशिवाय शेट्टींना झोप लागत नाही : सदाभाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:16 IST

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे. मला हनुमान म्हणणाºया लंकापतींनी रयत कोणत्या बाजूने आहे, हे पाहावे. आमचे नाव घेतल्याशिवाय त्यांना हल्ली झोपच लागत नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

नव्याने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खोत म्हणाले, आदी मानवाला शेपूट होती. ती नष्ट झाल्यानंतरच तो दोन पायाचा माणूस झाला, असा डार्विनचा सिद्धांत सांगतो. त्यामुळे सदाभाऊ आता माणूस बनला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांना तीन वर्षापर्यंत सरकार चांगले काम करत नसल्याचे समजले नाही.मात्र, निवडणुकीला दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांना सरकार नको झाले आहे. सत्तेत राहिल्यास जनता प्रश्न विचारेल. त्यामुळे बाहेर पडून सरकारविरोधी दंगा करून जनतेची सहानुभूती मिळावी. तसेच चर्चेत राहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज व्हावी, म्हणून बोलत राहायचे, एवढेच धोरण त्यांनी सध्या अवलंबले आहे.लढा यशस्वी करणारे शहरलढा कसा सुरू करावा, तो कसा यशस्वी करावा, हे इचलकरंजी शहरातून घेण्यासारखे आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी हे शहर निवडल्याचे खोत यांनी सांगितले.