शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेल लेखन स्पर्धेत हजाम, तर वाचन स्पर्धेत भगत, धुमाळ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:22 IST

सक्षम संस्था आयोजित ब्रेल लेखन स्पर्धेत वैष्णवी हजाम हिने, तर वाचन स्पर्धेत यश धुमाळ आणि अतुल भगत या अंध विद्यार्र्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

ठळक मुद्देब्रेल लेखन स्पर्धेत हजाम, तर वाचन स्पर्धेत भगत, धुमाळ प्रथमसक्षम संस्थेतर्फे तिळगूळ वाटप : ५२ स्पर्धक सहभागी

कोल्हापूर : सक्षम संस्था आयोजित ब्रेल लेखन स्पर्धेत वैष्णवी हजाम हिने, तर वाचन स्पर्धेत यश धुमाळ आणि अतुल भगत या अंध विद्यार्र्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेने दोन गटांत ही स्पर्धा घेतली. विजेत्यांना येथील अंधशाळेत संक्रांतीनिमित्त बुधवारी (दि. १५) झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली. यावेळी तिळगूळ वाटप करण्यात आले.स्पर्धेचा निकाल भक्ती करकरे यांनी जाहीर केला. ब्रेल वाचन स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ विजेते जाहीर करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावी गटातील ब्रेल लेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. विविध शाळांतील ५२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.प्रास्ताविक भाषणात लुई ब्रेल यांच्या जीवनपटाची माहिती ‘सक्षम’चे अध्यक्ष गिरीश करडे यांनी दिली. अंधशाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे यांनी ब्रेल लिपी का आवश्यक आहे, याविषयी माहिती दिली.

तत्पूर्वी ब्रेल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘सक्षम’च्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, गौतम कांबळे, क्षमा खोमणे, डॉ. चेतन खारकांडे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सारिका करडे आणि विनोद पालेशा यांनी केले.स्पर्धेचा निकाल- ब्रेल लेखन स्पर्धा(इयत्ता आठवी ते दहावी गट)- प्रथम - वैष्णवी विश्वास हजाम (विद्यापीठ हायस्कूल), द्वितीय - सुशांत मल्लिकार्जुन दाशाळ (विद्यापीठ हायस्कूल), तृतीय - गंगासागर विठ्ठल पातळे (विकास विद्यामंदिर),ब्रेल वाचन स्पर्धा :(इयत्ता आठवी ते दहावी गट) : प्रथम - अतुल विश्वनाथ भगत (विकास विद्यामंदिर), द्वितीय- कामिनी ज्ञानेश्वर गडदे (विकास विद्यामंदिर), तृतीय - नेताजी गोविंद काणेकर (विद्यापीठ हायस्कूल) (इयत्ता पाचवी ते सातवी गट) : प्रथम - यश मारुती धुमाळ (अंधशाळा), द्वितीय -पौर्णिमा सुरेश मर्दाने (अंधशाळा), तृतीय - स्नेहल संजय कचरे (अंधशाळा).

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर