शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मराठा जागृती मंच'तर्फे १४ जानेवारीला शौर्य दिवस, कोल्हापुरातून दीडशेवर कार्यकर्ते हरियाणाला जाणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 27, 2023 18:53 IST

पैश्याच्या आवाहनाला बळी पडू नका

कोल्हापूर : पानिपतच्या रणसंग्रामाच्या स्मृती जागवणारा मराठा शौर्य दिवस १४ जानेवारीला हरियाणातील बसताडा येथे होत असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे कर्मवीर मराठा व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पानिपत लढाईत वीरमरण आलेल्या योध्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गेली २१ वर्ष हा उपक्रम केला जातो.ते म्हणाले, पानिपतच्या तिसऱ्या लढाईतून वाचलेल्या व हरियाणा येथे स्थायिक झालेल्या मराठा सैनिकांच्या वंशजांना २५० वर्षे रोड नावाने ओळखले जात होते. मात्र समाजाचे नेते माजी सनदी अधिकारी वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी १० वर्षे संशोधन करून त्यांना मराठा ही ओळख मिळवून दिली.मराठा ही ओळख सिद्ध होण्यापूर्वीची स्थिती व त्यानंतर समाजात अनेक सामाजिक व राजकीयदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाले आहेत, यासाठी समाज कायमच डॉ. मोरे यांचा ऋणी राहील. याला देशभरातून १० ते १२ लाख कार्यकर्ते व कोल्हापूर जिल्ह्यातून १५० हून अधिक कार्यकर्ते जातात. यंदाही कोल्हापूरकरांनी या दिवशी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय महाले, दिलबर महाले, प्रविण घडतान उपस्थित होते.

पैश्याच्या आवाहनाला बळी पडू नकामहाले म्हणाले, आम्हाला फक्त महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे प्रेम, आपलेपणा हवा आहे. पण पानिपत मोहिमेच्या नावाखाली काही बेकायदेशीर संस्था नागरिकांकडून पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हरियाणातील मराठा समाज आर्थिकदृष्टया पुर्णत: संपन्न असून किमान १ लाखांवर तरुण परदेशांमध्ये नोकरी करत आहेत. हजारो मुले मोठ्या पदावर कार्यरत आहेत. देशभरातून कितीही कार्यकर्ते आले तरी त्यांनी सगळी सोय करण्याची ताकद मराठा जागृती मंचमध्ये आहे. त्यामुळे कोणिही कोणत्याही संस्थेला यासाठी पैसे देऊ नका.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर