शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या उमेदवारीचा निर्णय शरद पवारच घेणार : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:58 IST

आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. हसन मुश्रीफ आमचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये माझ्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली आहे माहिती नाही

कोल्हापूर : आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. हसन मुश्रीफ आमचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये माझ्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली आहे माहिती नाही. मात्र, माझ्या उमेदवारीबाबत पवारसाहेबच निर्णय घेतील आणि तो मला बंधनकारक असेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली.महाडिक यांना सलग दुसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे मला हा पुरस्कार दुसºयांदा मिळाल्याचे सांगून त्यांनी जनतेने ही संधी दिल्याबद्दल आभारही मानले. पी.आर.एस. इंडिया, प्राईम पॉर्इंट फौंडेशन, प्रो सेन्स आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्यावतीने देशातील सर्व खासदारांच्या संसदेतील कामांचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात येतो. संसदेतील कामकाजात सहभाग, विविध प्रश्नांची मांडणी, हे प्रश्न सोडविण्यासाठी केलेला पाठपुरावा, नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याची तयारी, संसदेत उपस्थित केलेले ९७० प्रश्न, ४६ चर्चांमध्ये घेतलेला सहभाग, सादर केलेली ६ खासगी विधेयके, लोकहितासाठी कायदे बदलासाठीचा आग्रह याची दखल घेत आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग, विमानतळ, पासपोर्ट सुविधा, रस्त्यांची कामे, ईएसआय हॉस्पिटल, बास्केट ब्रिज हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन कोट्यवधीचा निधी मंजूर केल्याचे महाडिक यांनी सांगीतले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, अभिजित मगदूम, पृथ्वीराज महाडिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मी राष्टवादीचाच !मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुम्हाला केंद्रीय मंत्री करतो,’ असे म्हटले होते याची आठवण करून दिली असता महाडिक म्हणाले, प्रत्येक पक्षाला काम करणारे, धडपडणारे उमेद्वार हवे असतात. त्यादृष्टीने ते सन्मान देण्यासाठी म्हणून ते बोलले होते. मात्र, मी राष्ट्रवादीचा खासदार आहे आणि आमच्या पक्षात पवारसाहेब जो निर्णय देतील तो मान्य केला जातो, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.उद्या चेन्नई येथे  पुरस्कार वितरणउद्या चेन्नई येथे आय.आय.टी मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.मंगळवारपासून बिदर रेल्वे सुरू होणारयेत्या मंगळवारपासून कोल्हापूर-बिदर रेल्वे सेवा सुरू होत असल्याचे सांगून महाडिक म्हणाले, सध्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनशी संबंधित ८० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. पुणे, मिरज आणि मिरज कोल्हापूर दुहेरीकरणाची कामे मंजूर असून हे दुहेरीकरण झाल्याशिवाय कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला चालना मिळणार नाही म्हणूनच त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर