शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

'शांताबाई’, ‘चोरीचा मामला'वर थिरकल्या सखी

By admin | Updated: February 29, 2016 00:53 IST

टाळ्या, शिट्ट्यांची बरसात : लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत, पूनम कुडाळकर यांनी डोलवले

कोल्हापूर : ‘शांताबाईचा नखरा, चोरीचा मामला आणि ‘ग साजणी, आली ठुमकत’ अशा गीतांना टाळ्या, शिट्ट्यांची होणारी बरसात, वन्समोअर अन् लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत, पूनम कुडाळकर यांचा अप्रतिम नृत्याविष्कार व जुगलबंदीचा आस्वाद शनिवारी सायंकाळी सखींनी घेतला.लोकमतने ‘सखी मंच’च्या सदस्यांसाठी कसबा बावडा महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर लावणीचा कार्यक्रम झाला. लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी वेंकटेश ज्वेलर्सचे विशाल भारती, अ‍ॅड. मृदुला वाघमारे, सीईओ विवेक रणवरे व भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, सुधा भारतकुमार राण , नगरसेविका व सखी मंचच्या सदस्या उमा इंगळे उपस्थित होत्या. वेंकटेश ज्वेलर्स आणि प्रतिभा मिल्क कार्यक्रमाचे प्रायोजक होते.टाळ्या, शिट्ट्या, रुमाल, फेटे, ओढणी उडविणे, लावण्यवतींसोबत नृत्य करण्याची एकही संधी सखींनी सोडली नाही. यंदा प्रथमच सखींसाठी लावणीचा दुरंगी सामना आयोजित केला होता. लावण्यवतींनी आपल्या जुगलबंदीने सखींना घायाळ केले. सुरुवातीला अर्चना सावंत यांच्या गु्रपने ‘मनमोहना तू ’ या गीतावर लावणी सादर केली. त्यानंतर ‘या रावजी, बसा भावोजी’ या गीतावर तर अर्चनाच्या नृत्याला अक्षरश: टाळ्या, शिट्ट्या आणि ओढणी उडवित स्वत: मंचावर जाऊन सखींनी आनंद लुटला. त्यानंतर पूनम कुडाळकर हिच्या ‘कुणी तरी यावे मला फिरवायला’ , ‘सोडा राया नादखुळा’ ‘पप्पी दे, पप्पी दे पारुला’ या गीतावर तिच्यासोबत फुगडी घालून तिच्याबरोबर नृत्यामध्ये सहभागी झाल्या. अर्चना सावंत यांनी ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातील ‘गं साजणी’, ‘दिसला गं बाई दिसला, गालात खुदकुन हसला’ तर ‘गंमत-जंमत ’या चित्रपटातील ‘चोरीचा मामला, मामाही थांबला’ आणि ‘शांताबाईचा नखरा, चखरा’या लोकगीतांवर तब्बल १५ ते २० मिनिटे सखींनी अर्चना सावंत यांच्या ग्रुपबरोबर मंचवर व प्रेक्षकांत जाऊन नृत्य केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशिद पुणेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सखी मंचच्या संयोजन समितीतील सदस्यांनी उत्कृष्ठ नियोजन केले. (प्रतिनिधी)