शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ‘सुकाणू समिती’चा शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:41 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला. सरकार दरबारी मागण्या करून थकल्याने बारा महिने आमच्यासोबत प्रामाणिकपणे असलेला मुका बैलच जिल्हाधिकाºयांशी बोलेल, असा आग्रह धरत ‘बैल-एक्का’ आत नेण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत चांगलीच खडाजंगी उडाली.महावीर गार्डन ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला. सरकार दरबारी मागण्या करून थकल्याने बारा महिने आमच्यासोबत प्रामाणिकपणे असलेला मुका बैलच जिल्हाधिकाºयांशी बोलेल, असा आग्रह धरत ‘बैल-एक्का’ आत नेण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत चांगलीच खडाजंगी उडाली.महावीर गार्डन येथून महाराष्टÑ राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या मोर्चास सुरुवात झाली. ‘बैल-एक्क्या’तून सविनय कायदेभंग फॉर्म ठेवून माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.सरकार बहिरे झाल्याने आम्ही आता त्यांच्याशी बोलणार नाही, माणसाची भाषा कळत नसल्याने मालकाशी इमानीइतबारे राहणारा मुका बैलच आमची व्यथा जिल्हाधिकाºयांसमोर मांडेल. त्यामुळे तरी प्रशासनाचे डोळे उघडतात काय पाहू, असे सांगून संपतराव पवार यांनी ‘बैल-एक्का’ जिल्हाधिकारी कार्यालयात घालण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी एक्का आवारात घेण्यास हस्तक्षेप केल्याने पवार व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली.त्यानंतर झालेल्या सभेत संपतराव पवार यांनी सरकारसह जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली. राज्य व केंद्रातील सरकार हे लबाडांचे असून, ते कष्टकरी जनतेला ताकदीच्या बळावर दाबून टाकत आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी केवळ रस्त्यांवर उतरून चालणार नाही. गावागावांत सरकारविरोधात बंड उभे केल्याशिवाय आपण जगू शकणार नाही. इंग्रजांच्या काळात देखील लोकशाही मार्गाने होणाºया आंदोलनाला कधी विरोध झाला नाही. सध्याच्या काळ्या ब्रिटिशांना बैलाचे एवढे वावडे का? अशी विचारणा पवार यांनी केली.यावेळी किसान सभेचे प्रा. नामदेव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.आंदोलनावेळी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, केरबा भाऊ पाटील, अंबाजी पाटील, एकनाथ पाटील, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, प्रमोद पाटील, संग्राम पाटील-म्हाळुंगेकर, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.सरकारचे नाक मोडते का ?आम्ही लोकशाही मार्गाने, तेही शांततेत शेतकºयांच्या भावना बैल-एक्क्याच्या माध्यमातून मांडत असताना पोलिसांनी दडपशाही चालविली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना आदेश दिल्याने आम्हाला रोखले गेले. बैल-एक्का आत गेल्याने सरकारचे नाक मोडते का ? अशी टीका पवार यांनी केली.पोलीस कर्मचाºयाने फॉर्म स्वीकारलेसुकाणू समितीने निवेदनाऐवजी बैल-एक्क्यातून सविनय कायदेभंगाचे फॉर्म आणले होते. ते बैल-एक्क्यातून जिल्हाधिकाºयांच्या कक्षाबाहेर ओतण्याचा आंदोलनकर्त्यांचा आग्रह होता. पोलिसांनी मज्जाव केल्याने प्रवेशद्वारातच पोलीस कर्मचाºयाने ते फॉर्म स्वीकारले.