शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

शौमिका महाडिक, राजू मगदूम यांच्यात खडाजंगी; कोल्हापूर जिल्हा परिषद दणाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:56 IST

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला ...

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांच्यात जोरदार वादावादी झाली. पंधरा मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या शाब्दिक खडाजंगीने अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरसह जिल्हा परिषद दणाणली. अखेर बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर व गटनेते अरुण इंगवले यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविल्याने प्रकरण शांत झाले. मगदूम या आवाडे गटाचे सदस्य आहेत.यशवंत ग्राम पुरस्कारासाठी गावांची निवड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजरा तालुक्यातील हत्तीवडे आणि हातकणंगलेतील माणगाव या दोन गावांना समान गुण मिळाल्याने पुरस्कार निवडीचा गुंता निर्माण झाला आहे. यावर जिल्हा परिषदेत धुसफूस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या संदर्भात अध्यक्षा महाडिक यांनी माणगावचे उपसरपंच मगदूम यांना बैठकीसाठी बोलावले; पण स्वत: त्याच कार्यालयात उपस्थित नसल्याने बैठक होऊ शकली नाही. अखेर दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुन्हा एकदा मगदूम यांना बोलावले. अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरमध्ये बैठक सुरू होती. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे हेही उपस्थित होते. मगदूम यांनी ‘तुम्ही पाच गुण वाढवून देतो असे म्हटला होता, त्याचे काय झाले?’ अशी विचारणा केली, ‘हत्तीवडे गावाची लोकसंख्या एक हजार आहे, आमच्या गावची १६ हजार आहे. आम्हाला डावलले तर आम्ही सगळा गाव जिल्हा परिषदेत आणू,’ असे त्यांनी सांगितले. यावर भडकलेल्या महाडिक यांनी ‘राजू मगदूम, तुम्ही पेपरबाजी करता; मी खपवून घेणार नाही,’ असे सुनावले.यावर मगदूम यांनीही ‘आवाज वाढवून बोलायचे नाही; तुम्ही आमच्या मालक नाही. हळू आवाजात बोलायचे,’ असे सांगताच दोघांमध्ये जोरदार वादाला सुरुवात झाली. ‘लहानसहान गोष्टींत राजकारण करताय; निदान मोठे तरी करा,’ असे महाडिक यांनी सुनावले. याला मगदूम यांनीही ‘आम्ही लहानच राजकारण करणार; तुम्ही मोठे करा,’ असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. एकेरीवर आलेला वाद हातघाईवर येणार म्हटल्यावर बांधकाम सभापती पेरीडकर व इंगवले यांनी हस्तक्षेत करीत दोघांनाही शांत केले. वाद मिटला तरी यावरून जिल्हा परिषदेचे वातावरण चांगलेच तापले होते.इशारे काय देता..सत्तेतून बाहेर पडा : महाडिकहा वाद सुरू असतानाच सदस्य राहुल आवाडे यांनी हस्तक्षेप करीत ‘अध्यक्षांप्रमाणे वागा,’ असे म्हणताच भडकलेल्या महाडिक यांनी ‘सारखा-सारखा इशारा काय देता? सत्तेतून बाहेर पडा!’ असे सुनावले. यावर मगदूम यांंनी, तुम्हाला सांगूनच बाहेर पडतो. तुम्ही करवीरच्या सभापतींचा राजीनामा काही तासांत मंजूर केला; महिला बालकल्याण सभापतींचा राजीनामा मंजूर करण्यासाठी दहा दिवस घालवल्याची आठवण करून दिली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.सत्ताधाऱ्यांमध्येच धुमशानसत्ताधाºयांमध्येच वाद होण्याची जिल्हा परिषदेतील गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. चार दिवसांपूर्वी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे व सदस्य राहुल आवाडे यांच्यात सायकल वाटपावरून वादावादी झाली. यापूर्वी सर्वसाधारण सभेतही असाच वाद झाला होता. आता सत्ताधारी अध्यक्ष व महिला बालकल्याणच्या सभापतीचे पती यांच्यात झालेल्या वादाने संघर्ष कोणत्या टोकावर पोहोचलाय, याची झलक दिसत आहे.आकांडतांडव करणे चुकीचे : महाडिकनिकाल जाहीर करण्यापूर्वी आकांडतांडव करणे चुकीचे आहे. अध्यक्ष म्हणून माझा या निर्णय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नाही. राजू मगदूम हे अधिकाºयांवर दबाब आणतात. गैरसमज पसरवतात. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे, म्हणून त्यांना सुनावले. मी कधीही सावत्रपणाची भूमिका घेतलेली नाही, असे महाडिक यांनी सांगितले.अध्यक्षांनी पदाला शोभेल असे वागावे : आवाडेअध्यक्षा महाडिक यांनी पदाला शोभेल असे समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित होते; पण याऐवजी त्या एकेरीवर येऊन सदस्यांशी बोलतात. दादागिरीची भाषा करणे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. नेत्यांच्या कानांवर या गोष्टी घातल्या जाणार आहेत असे सदस्य राहूल आवाडे यांनी सांगितले.न्यायासाठीच भांडलो : मगदूममाझ्या गावाची लोकसंख्या जास्त असतानाही जाणीवपूर्वक डावलले जात असल्याबद्दल अध्यक्षांकडे रीतसर तक्रार केली. स्वत: अध्यक्षांनीच केबिनमध्ये बोलावल्यामुळे गेलो असताना तेथे चर्चेऐवजी आमच्यावरच पेपरबाजी करीत असल्याचा आरोप करीत त्या जाब विचारतात, हे योग्य नाही. न्यायासाठी भांडलो आणि यापुढेही भांडत राहणार असल्याचे माणगांवचे उपसरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.