शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

By admin | Updated: March 21, 2017 11:51 IST

काँग्रेसचे दोन सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता : सतेज पाटील, मुश्रीफसोबत पी. एन यांच्यात वाद

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड आज दुपारी होणार असून भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका आणि उपाध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांची नावे जाहीर झाली आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी आता भाजप, शिवसेना आणि काही आघाड्या एकत्र आल्या आहेत.

काँग्रेसकडून माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांचे नावे जाहीर झाले होते,पण रात्रीतून नव्या घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसने आता अध्यक्षपदासाठी बंडा माने तर उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे मंगळवारी सकाळीच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत माजी आमदार पी. एन. पाटील यांची वादावादी झाली. आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी या आमदारांवर केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांची चढाओढ मंगळवारी सकाळीही कायम होती.

ताज्या घडामोडीनुसार कोणत्याही परिस्थितीत भाजता आघाडीशी हातमिळविणी करणार नाही, आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप काढणाऱ्या शिवसेनेने अचानक युटर्न घेत पक्ष अध्यक्षपदाची निवडणुक लढविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील यांनीही आज सकाळी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजता आघाडीचे संख्याबळ वाढले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचा आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा अशी नवी तडजोड झाली आहे. यामुळे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. तशा सूचना हॉटेल अयोध्या येथे सकाळी झालेल्या बैठकीत सर्व नूतन जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बेळगावकडे रवाना झाले.

अतिशय वेगाने घडलेल्या घडामोडीनंतर भाजता आघाडीकडे ३७ सदस्यांचे संख्याबळ झाल्याने हे सर्व सदस्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या बंगल्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार शौमिका महाडिक, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, हिंदुराव शेळके, राहुल आवाडे, जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसच्या गोटात मोठा बदल झाला आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका कायम ठेवत पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांना विरोध केल्यामुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सकाळी अध्यक्षपदासाठी बंडा माने आणि उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांची सकाळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याबरोबर वादावादी झाली. दोघांनीही आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बजरंग देसाई आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे दोन सदस्य निवडणुकप्रसंगी अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ यावेळी कमी असण्याची शक्यता आहे.