शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:18 IST

अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला.

ठळक मुद्देमहावीर उद्यान येथून स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

कोल्हापूर : अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच फिरायला येणाºया नागरीकांनी उद्यानात श्रमदान करुन स्वच्छता केली.

या मोहिमे अंतर्गत बुधवारी सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत महावीर उद्यान येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये महावीर उद्यानाची तसेच सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यानंतर आडगळीच्या ठिकाणी औषध फवारणी करुन डीडीटी पावडर मारण्यात आली. माहिमेमध्ये महापालिकेच्या सुमारे 450 हून अधिक अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला. महावीर उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही स्वच्छता मोहिमेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

उपस्थित नागरीकांच्यावतीने आयुक्त कलशेट्टी यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निसर्ग व आरोग्य याचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले. नागरीकांनी शहरातील उद्यानांविषयी बाजू मांडून महापालिकेने अशाच प्रकारे सर्व उद्यानांची स्वच्छता सेवा मोहिम राबवावी व उद्यानानमधील कमतरतांची पुर्तता करुन घेणेसाठी नागरीकांचीही सहभाग घ्यावा, अशी विनंती आयुक्तांनी केली.

स्वच्छता मोहिमेत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता आर. के. जाधव, रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबळे, एलबीटी अधिकारी सुनिल बिद्रे, विजय वणकुद्रे यांच्यासह मोठया प्रमाणात अधिकारी, विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आरोग्य सफाई, पवडी, बागा विभागाकडील कर्मचारी यांनी भाग घेतला. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महावीर जयंतीचा औचित्य साधून महावीर उद्यानातून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ केला. या मोहिमेत आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी भाग घेतला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर