शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

शिरोली दुमालातील ‘शेलारमामा’ दत्तू पाटील --सात दशके मर्दानी खेळ ठेवलाय जागता : शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 20:46 IST

‘रायगडाच्या पयल्या पायरीवर पाय ठेवला की कधी एकदा गडावर पोचून तिथली माती कपाळावर माखून मर्दानी ख्योळ दाखवीन असं हुतंया..’ ८७ वर्षीय ‘शेलारमामां’चे हे बोल तरुणाईच्या अंगात दहा हत्तीचं बळ आणतात.

भरत बुटाले ।कोल्हापूर : ‘रायगडाच्या पयल्या पायरीवर पाय ठेवला की कधी एकदा गडावर पोचून तिथली माती कपाळावर माखून मर्दानी ख्योळ दाखवीन असं हुतंया..’ ८७ वर्षीय ‘शेलारमामां’चे हे बोल तरुणाईच्या अंगात दहा हत्तीचं बळ आणतात.शिवराज्याभिषेक दिनी गेली आठ वर्षे रायगड पायी चढणाऱ्या शिरोली दुमाला येथील दत्तू पाटील व मर्दानी खेळ यांचं नातं गेल्या सात दशकांचं आहे. ‘शेलारमामा’ ही पदवी त्यांना रायगडाच्या साक्षीनेच १९८०मध्ये जनसमुदायाने बहाल केली आहे.

पैलवानाला जशी लाल माती खुणावतेय, तशी पाटील यांना मर्दानी खेळाची शस्त्रं खुणावतात. मावळ्याची वेशभूषा परिधान करून खेळाचं प्रात्यक्षिक सादर करताना त्यांच्यातील चपळाई अनुभवता येते.दांडपट्टा फिरविणे असो, दांडपट्ट्याने लिंबू कापणे, लाठी-काठी फिरविणे, तलवारबाजी, पेटती समई डोक्यावर ठेवून समतोल साधत दोन्ही हातांत कारली घेऊन चौफेर फिरविणे, इट्यांनी १२ फुटांवरचं लक्ष्य अचूक टिपणं, दोरीला बांधलेली वीट फेकून ती परत हातात घेणं, दंड फळी, एकमोरी फळीवर संतुलन साधणं, भालाफेक, आदी कलांमध्ये ते माहीर आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना वयाच्या १६व्या वर्षी पाटील यांच्यासह १० ते १२ जणांनी गोपाळ पाटील यांच्याकडून मर्दानी खेळाचे धडे घेतले. तो काळ ग्रामीण जनतेसाठी कसोटीची होता. काबाडकष्ट, हलाखीची परिस्थिती, शिक्षणाचा तर पत्ताच नाही, काळं हुलगं, नाचण्याच्या भाकरीबरोबर भिजवलेलं हिरवं उडीद खाऊन जगलेली ही माणसं. तेही पुरेसं नाही. तरीही इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रामाणिक सराव ही बलस्थानं त्यांच्यातली रग कायम टिकवून आहे.

सडपातळ बांधा, भारदार मिशा, अंगात तीन बटणी शर्ट, विजार, खांद्यावर टॉवेल असं व्यक्तिमत्त्व असलेले दत्तू पाटील शेतात कुटुंबासह काबाडकष्ट करतात. खासदार संभाजीराजे यांच्या आग्रहास्तव २००९ पासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर जातात. तेथे त्यांच्या मर्दानी खेळाचा थरार अनुभवयास मिळतो.मर्दानी खेळाची जवळजवळ सर्वच शस्त्रं पाटील यांच्याकडे आहेत. त्याद्वारे त्यांनी शिरोलीतील १००वर युवक-युवतींना मर्दानी खेळ शिकविला आहे. असा हा अवलिया यावर्षीही मर्दानी खेळाचा थरार दाखविण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशीच पोहोचला आहे.मर्दानी खेळाचे साहित्यदांडपट्टा, तलवारी, ढाल, इट्या, भाला, समई, लाठी-काठी, इच्या, काठी बंदाटी, जोडी बंदाटी, डबल दंड अशी अनेक प्रकारची शिवकालीन शस्त्रं दत्तात्रय पाटील यांच्या घरी पाहावयास मिळतात. 

खासदार संभाजीराजांमुळंच मला माझ्यातला मर्दानी खेळ मुंबई, दिल्लीपर्यंत दाखवायला मिळाला. आताच्या पोरांनीही मर्दानी खेळ शिकून शिवाजी महाराजांचं नाव जागवत ठेवायला पाहिजे.- दत्तात्रय पाटील