शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शाहूंच्या शिक्षण कायद्याची निघणार पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:28 IST

सप्ताहही साजरा करणार : राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सुचविल्याप्रमाणे शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक कायद्याला २१ सप्टेंबर २०१७ला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राजर्षी शाहू शिक्षण क्रांतिदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी त्यांनी केलेल्या शिक्षणविषयक कायद्याची पुस्तिका प्रसिद्ध करण्याचेही ठरविण्यात आले तसेच यानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.दि. २६ जून २०१७ रोजी शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. माशेलकर यांनी हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी याबाबत स्वतंत्र पत्र पाठवून याबाबतचे उपक्रमही सुचविले होते. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या या बैठकीत नियोजित उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या दिवशी शिक्षणविषयक परिसंवाद घेण्यात येणार असून या विचारमंथनातून काढण्यात आलेले निष्कर्ष शासनाला सादर करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक या कायद्याची माहिती देणारी जी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे; त्याला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रस्तावना देणार आहेत. या बैठकीला महापौर हसिना फरास, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. अशोक चौसाळकर आदी उपस्थित होते. निष्कर्ष शासनास देणारजे वैचारिक मंथन होणार आहे; त्याबाबतचे निष्कर्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्या बाबतही यावेळी विचार झाला.