शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शाहू पुतळा प्रस्ताव रखडणार

By admin | Updated: March 23, 2017 00:27 IST

शिल्पकार कोण असेल हे अनिश्चित : जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

कोल्हापूर : कला संचालनालयाकडे शाहू महाराजांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल आणि शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे मंजुरीसाठी अंतिम रेखांकन सादर न केल्याने या दोघांचे अहवाल आल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या शाहू पुतळ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे हे काम रखडणार असल्याची चिन्हे आहेत. मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली. हे दोन्ही अहवाल त्वरित प्राप्त करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या ध्वजस्तंभासमोर राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुमारे तीस लाख रुपयांपर्यंतच्या निधीचेही नियोजन करण्यात आले. अजूनही प्रत्यक्षात निधीसंकलन झाले नाही; परंतु बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापालिका, पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायांसह प्रस्तावाची फाईल २९ डिसेंबर २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली होती. हा प्रस्ताव अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ११ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता नसणे आणि मुख्य वास्तुशास्त्रज्ञांचा अहवाल नसणे यावर चर्चा झाली.या दोन्ही परवानग्या मिळाल्याशिवाय प्रस्ताव शासनाकडे सादर करता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. स्थानिक पातळीवरील ना हरकत दाखले जरी जिल्हा परिषदेने जोडले असले तरी अजूनही मुंबईतील हे दोन दाखले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, उपकार्यकारी अभियंता एम. टी. शिंदे उपस्थित होते.शिल्पकार निश्चिती महत्वाची१ जिल्हा परिषदेने अजूनही अधिकृतरीत्या शिल्पकार निश्चित केलेला नाही. यासाठी जी पुतळा समिती तयार करण्यात आली आहे ती जिल्हा परिषदेशी संलग्न करण्यात आली नाही. २ कारण जिल्हा परिषदेच्या प्रक्रियेनुसार त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे ही अस्थायी समिती तयार करण्यात आली आहे. शिल्पकार निश्चित झाल्यानंतर त्यांच्याकडून क्ले मॉडेल करून घेऊन त्याला कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागेल. ३ पुतळ्याची उंची निश्चित झाली की चबुतऱ्याची उंची ठरवावी लागेल. हा खर्च जिल्हा परिषदेचे कंत्राटदार करणार आहेत. मात्र, त्यासाठीच्या रेखांकनाला मुख्य वास्तूशास्त्रज्ञांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळेच आता एकूण प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. शिल्पकार संताजी चौगले यांच्या नावाची चर्चाबाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करणारे शिये (ता. करवीर) येथील शिल्पकार संताजी चौगले यांच्याकडे या पुतळ्याचे काम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तशी प्राथमिक चर्चाही झाली होती. मात्र, तोपर्यंत आचारसंहिता सुरू झाल्याने पुढचे काम थांबले.