शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधी चारी बाजूने बंदिस्तच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:13 IST

कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासंबंधी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी महापौर सरिता मोरे ...

कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासंबंधी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी महापौर सरिता मोरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याने या विषयावरून वाद वाढण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगराच्या बाजूला स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवल्याशिवाय संरक्षक भिंतीचे काम सुरू करू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे, तर पावित्र्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्मारक बंदिस्त राहील, असे महापौरांनी स्पष्ट केले.शाहू समाधी स्मारकचे काम पूर्णत्वास येण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा तसेच सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्याकरिता सोमवारी दुपारी महापौर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ताराराणी सभागृह येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत तोडगा निघाला नाही. उलट हा वाद वाढण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली.उपमहापौर भूपाल शेटे यांनी स्मारकाची माहिती दिली. सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या सांस्कृतिक हॉलमधील व्यायामशाळा भगतसिंग तरुण मंडळाजवळील हॉलमध्ये स्थलांतर करावी लागणार असल्याचे सांगितले. संरक्षक भिंत घालण्यामागे स्मारकाचे पावित्र्य आणि सुरक्षितता जपण्याकरिता एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवणार असून, चारी बाजूने भिंत असेल, असे शेटे यांनी सांगितले.सिद्धार्थनगराकडील बाजूला नागरिकांकरिता स्वतंत्र प्रवेशद्वार करावे, तेथील नागरिक रोज ये-जा करतात. उद्या भिंत घातल्यावर नागरिकांनी कुठून जायचे, अशी विचारणा वसंत लिंगनूरकर यांनी केली. व्यायामशाळाही तेथून हलवू नये, अशी विनंती त्यांनी केली. आंबेडकर हॉलचे बांधकाम करून वरील मजल्यावर ग्रंथालय, अभ्यासिका कराव्यात, असेही लिंगनूरकर यांनी सांगितले. त्यावेळी या हॉलमध्ये शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित आर्ट गॅलरी असणार आहे, त्यामुळे तेथील व्यायामशाळा स्थलांतर करावी लागेल, असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.यावेळी परिवहन सभापती अभिजित चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, प्रभाग समिती सभापती हसिना फरास, नगरसेविका मेहेजबिन सुभेदार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अफजल पिरजादे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, उपशहर अभियंता एस. के. माने, आर्किटेक्चर अभिजित जाधव, ठेकेदार व्ही. के. पाटील, वसंतराव मुळीक उपस्थित होते.