शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधी स्मारकाचे लोकार्पण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:15 IST

कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले ...

ठळक मुद्देशाहू समाधी स्मारकाचे लोकार्पण लवकरचमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांना निमंत्रण देणार

कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, अंतिम टप्प्यातील सर्व कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण होतील, असा निर्वाळा अधिकारी तसेच ठेकेदार यांनी दिला आहे. समाधी स्मारक लोकार्पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दोन दिवसांत निमंत्रण देण्यात येईल, असे महापौर माधवी गवंडी यांनी सांगितले.शाहू स्माारक समाधी कामाची सोमवारी महापौर गवंडी, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी माजी महापौर हसीना फरास, नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्ट अभिजित जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक उपस्थित होते.समाधिस्थळावर करावयाची पहिल्या टप्प्यातील सर्व कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. आता अंतिम टप्प्यातील कामे गतीने सुरू आहेत. या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काम काहीसे थांबले होते. लावण्यात आलेली नैसर्गिक हिरवळीचे नुकसान झाले. ती पुन्हा लावली जात आहे. चबुतरा, मेघडंबरी, पदपथ, इलेक्ट्रीक कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित किरकोळ काम येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जातील, असे सांगण्यात आले.समाधी परिसरातील शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या मंदिराची डागडुजी करण्यावर चर्चा झाली. ही मंदिरे छत्रपती घराण्याच्या मालकीची असल्याने त्यांच्या परवानगीने ती पूर्ण करावीत, तर शेजारी बाबासाहेब आंबेडकर हॉलवरील झाडेझुडपे तातडीने काढावीत, परिसरातील दोन तीन झाडांच्या फांद्या छाटाव्यात, मुख्य प्रवेशद्वाराजवळील इलेक्ट्रीक खांब स्थलांतर करण्याबाबत महावितरणला कळविण्यात यावे, अशा सूचना आयुक्त कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.शाहू समाधी स्मारक लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज, मंगळवारी किंवा उद्या, बुधवारी निमंत्रण देऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर