शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही ‘शाहू मिल्क पार्लर’

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

समरजितसिंह घाटगे : आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा

कागल : अनेक अडचणी, बरे-वाईट प्रसंग, अनुभव सोसून आता शाहू दूध संघ जोमाने उभारी घेत आहे. दर्जेदार उत्पादन आणि विश्वासार्हतेच्या जोरावर लोकप्रियही झाला आहे. भविष्यात ग्राहकांना घरपोहोच दूध देण्याची यंत्रणा राबविण्याबरोबरच ग्रामीण भागातही ‘शाहू मिल्क पार्लर’ ही संकल्पना राबविणार आहे, असे प्रतिपादन श्री छ. शाहू मिल्क अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे कार्यकारी संचालक समरजितसिंह घाटगे यांनी केले.व्हन्नूर येथे कार्यस्थळावर कंपनीच्या आठव्या सर्वसाधारण सभेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी कंपनीच्या संचालिका नवोदिता घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.समरजितसिंह घाटगे म्हणाले, दूध संघ सुरू करतानाच या व्यवसायाबद्दल शंका-कुशंका होत्या. कारण अनेक दूध संघ बंद पडल्याचे अनुभव होते. मात्र शाहू दूध संघ हा स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या दूरदृष्टीच्या जोरावर टिकून राहिला आणि प्रगतीपथावर देखील राहिला. आठ वर्षांत कधीही दूध उत्पादकांचे बिल थकण्याचे किंवा पुढे जाण्याची वेळ आलेली नाही. दूध संघाचे संचालक मंडळच मार्केटिंग कर्मचाऱ्यांप्रमाणे भूमिका पार पाडत आहेत. उपपदार्थांची विक्री यावर जोर दिला आहे. संघाच्या सर्व उत्पादनांना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणून ग्राहकांना घरपोच उत्पादने देण्यासाठी यंत्रणा तयार करून गरजेनुसार डिलरलाही ती देण्यात येईल. संघामार्फत ३२५ संस्थांना पशुवैद्यकीय सेवा पुरवली आहे. रोज सरासरी ९०० किलोग्रॅम उपपदार्थ विक्री होत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात संघाची वार्षिक उलाढाल ५६ कोटींवर पोहोचली आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल १०० कोटीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. स्वागत संजय बेलवळेकर यांनी, तर विषयपत्रिकेचे वाचन बी. एस. गोंधळेकर यांनी, तर आभार युवराज पसारे यांनी मानले. सभेला शाहू साखरचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, विजय औताडे, पै. दिनानाथसिंह, दीपक गोखले, दूध संघाचे संचालक पन्नुसिंह घाटगे, आनंदराव हिलगे, राजाराम चव्हाण, सुनील सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )राजेसाहेबांच्या आकस्मिक निधनाने शाहू ग्रुपची जबाबदारी माझ्यावर पडली. शाहू दूध संघाचे संचालकपद स्वीकारून नवोदिता घाटगे यांनी माझ्यावरील भार कमी केला आहे. अत्यंत आत्मीयतेने आणि कल्पकतेने त्या संघाच्या कारभाराकडे लक्ष देत आहेत. पुढील वर्षी कदाचित त्या कार्यकारी संचालक म्हणूनच भाषण करतील, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटल्यावर यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.