शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शाहू मिल स्मारकाचे गुऱ्हाळ! लग्नाचा नाही पत्ता, तोपर्यंत पाहुण्यांची बारशाची तयारी

By विश्वास पाटील | Updated: January 12, 2023 13:57 IST

शाहू स्मारकाचे आराखडे तयार केले आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत, परंतू मूळ जागाच अजून शासनाकडे हस्तांतरित झालेली नाही.

विश्वास पाटीलकोल्हापूर : अजून लग्नाचा पत्ता नाही, तोपर्यंत पाहुण्यांनी बारशाची तयारी सुरू केली असल्याचा अनुभव राज्य शासन येथील शाहू मिलच्या जागेवर करणार असलेल्या शाहू स्मारकाबाबत येत आहे. कारण शाहू मिलच्या जागेची मालकी आजही महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे आहे व ती जागा ताब्यात घेण्यासाठी साधे एका ओळीचेही पत्र शासनाकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठवण्यात आलेले नाही.मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सहा महिन्यांत शाहू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. म्हणून त्यातील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. तोट्यात गेल्याने ३१ ऑगस्ट २००३ ला शाहू मिलचा अखेरचा भोंगा बंद झाला आहे.वस्त्रोद्योग महामंडळ हे राज्य शासनाचेच अंग असल्याने हस्तांतर काय अवघड आहे, असा अविर्भाव आतापर्यंत चार सरकारने दाखवला आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या अगोदर काही दिवस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे स्मारकाची घोषणा केली. त्यांनी घाईगडबडीत येऊन त्याचा कोनशिला समारंभही उरकून घेतला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाले. परंतू पाच वर्षांत त्यांनी या स्मारकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीचे सर्व कार्यक्रम मिलच्या आवारात घेऊन मिल जिवंत केली. परंतू त्यांच्याही काळात जागा हस्तांतरित करण्यासाठी हालचाली झालेल्या नाहीत. त्यानंतर आता नव्याने हा विषय पालकमंत्री केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

शाहू स्मारकाचे आराखडे तयार केले आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत, परंतू मूळ जागाच अजून शासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागा स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात यावी, असा प्रस्ताव नगरविकास व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठवण्याची गरज आहे. त्यानंतरच हस्तांतराची प्रक्रिया सुरू होईल.

दृष्टिक्षेपात शाहू मिल

  • राजर्षी शाहू महाराजांनी १९०६ मध्ये दि शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल्सची पायाभरणी केली.
  • शाहूंनी त्यासाठी तळ्याजवळीच जागा व ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले
  • मिलचा शेवटचा भोंगा वाजला ३१ ऑगस्ट २००३
  • मूळ जागा : २६.७५ एकर
  • बांधकाम : १२.५ एकर जमिनीवर
  • गोदामे : १० मोठी लूम शेड
  • यंत्रसामग्रीची यापूर्वीच विक्री
  • मिलचा ताबा वस्त्रोद्योग महामंडळाकडे
  • महामंडळाचे कार्यालय व दोन कर्मचारी कायम सेवेत
टॅग्स :kolhapurकोल्हापूर