शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेकडून शाहू महाराजांच्या नावाचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 21:09 IST

Shiv Sena Kolhapur : तावडे हॉटेल चौकातील कमानीवर झळकणारा जाहिरातीचा फलक उतरवून त्याठिकाणी शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवाचा फलक शुक्रवारी लावण्यात आला.

ठळक मुद्देशहराच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेकडून शाहू महाराजांच्या नावाचा फलकदोन दिवसापासून झळकत होता जाहिरातीचा फलक

कोल्हापूर : तावडे हॉटेल चौकातील कमानीवर झळकणारा जाहिरातीचा फलक उतरवून त्याठिकाणी शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवाचा फलक शुक्रवारी लावण्यात आला.दोन दिवसापासून शहराच्या प्रवेशद्वारावर एका जाहिरातीचा फलक झळकत होता. याबाबत शहरवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी ह्लजय भवानी जय शिवाजीह्व, ह्लराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याह्व विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून प्रवेशद्वारावरच जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी दिलायावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, रणजीत जाधव, राजू पाटील, सुनील खोत, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, किशोर घाटगे, धनाजी दळवी, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, राजू काझी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर